Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Laxmikant Berde : जगाचा निरोप घेण्यापूर्वी ‘या’ दोन सहकलाकारांची आठवण

Preeti Zinta ने कार अपघातात गमावले होते पहिले प्रेम, अभिनेत्रीने

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सूर डी. एस.पी.चे…

 सूर डी. एस.पी.चे…
मिक्स मसाला

सूर डी. एस.पी.चे…

by Kalakruti Bureau 03/08/2020

देवी श्री प्रसाद या तेलगू आणि तामिळ चित्रपटातील प्रसिद्ध संगितकाराचा 2 ऑगस्ट रोजी वाढदिवस.  वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी या गायक आणि संगितकाराने अनेक पुरस्कार आपल्या खात्यात जमा केले आहेत. 

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत डीएसपी हे खूप मानाचे नाव आहे.  एक जादूई संगीतकार म्हणजे डीएसपी…देवी श्री प्रसाद…डीएसपी किंवा रॉकस्टार म्हणून देवी श्री प्रसाद या संगीतकाराची ओळख आहे.  वय अवघं 40…पण या संगीतकाराच्या खात्यात फिल्मफेअर, आयफा असे मानाचे अनेक पुरस्कार जमा आहेत.  डीएसपी म्हणजे तामिळ आणि तेलगू चित्रपटांतील हुकमी नाणे आहे.

देवी श्री प्रसाद यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले.  त्यांचे वडील सत्यानंद हे शिक्षक होते.  शिवाय त्यांना लेखनाची आवडही होती.  शाळेत असतांनाच देवी यांचा संगीताकडे ओढा जास्त होता.  शाळेत नृत्य आणि गाण्याच्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये देवी यांनी अनेक बक्षिसे जिंकली आहेत.  नीकोसम या 1999 मध्ये आलेल्या चित्रपटापासून देवी यांनी टॉलिवूडच्या संगित विश्वात पदार्पण केलं.  देवी प्रख्यात संगीतकार यू. श्रीनिवास यांचे शिष्य आहेत.  श्रीनिवास यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.  आपल्या गुरुप्रमाणेच देवी यांनी पहिल्याच चित्रपटात आपल्या संगीतची छाप पाडली.  त्यानंतर संगीतकार, गीतकार, गायक म्हणून ते तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम करु लागले.  देवी हे किती लोकप्रिय आहेत याचा अंदाज त्यांना मिळणा-या पुरस्कारावरुन लागतो.  आतापर्यंत त्यांनी नऊ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.  सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार, आयफा पुरस्कार यांचाही समावेश आहे.  देवी यांनी कुमारी 21एफ या चित्रपटात संगीत, आवाज दिलाच आहे.  शिवाय यातील गाण्यांचे नृत्यदिग्दर्शनही त्यांनी केले आहे.

मल्टी टॅलेंटेड असणारे देवी जेवढे लोकप्रिय तेवढेच नम्र म्हणून टॉलिवूडमध्ये ओळखले जातात.  लाखो फॅन असलेला हा गायक स्वतः इलाईराजा यांचा चाहता आहे.  त्यांची अनेक गाणी सूपरहीट गाण्याच्या टॉपटेन लिस्टमध्ये अनेक महिने राहीली आहेत.  त्यात 2018 मध्ये आलेल्या रंगस्थलम या तेलगू चित्रपटांतील गाण्यांनी तर कमालच केली आहे.  या चित्रपटातील गाणी म्हणजे ग्रामिण वाद्य संगीताचा अपूर्व मेळ आहे.  अत्यंत श्रवणीय असलेली ही गाणी अनेक महिने टॉपटेन गाण्यांच्या यादीत होती.  एकापेक्षा एक सरस असलेली रंगस्थलमची गाणी अगदी नाचायला लावणारी.  गाण्यांमधील बोल समजत नाहीत.  पण यातील संगीताच्या जोरावर भाषेचा अडसर आपोआप दूर होतो.  याशिवाय सूपर मची, रिंगा रिंगा, डॅडी मम्मी,  छोटी छोटी बातें ही देवी यांची गाजलेली गाणी आहेत.  देवी यांनी देवी, वसमी, वर्षम, बारीश, थिरुपची, बन्ना, आरु, समथिंग समथिंग, राखी, शेखर दादा जिंदाबाद, तुलसी, नाना वसंथम, जलसा, रेडी, संगमा, किंग, रंगमास्थलम, महर्षी, चित्रलहरी, सॅमी, सॅमी 2, एमसीए, डेंजरस जानबाज, जय लव कुश, पुल्ली  अशा अनेक गाजलेल्या तेलगू आणि तामिळ चित्रपटांना संगित दिले आहे.

देवी श्री प्रसाद हे पारंपारिक आणि  पाश्चात्य संगीतातही माहीर आहेत.  वयाच्या अवघ्या 41 वर्षात अनेक पुरस्कार आपल्या खात्यात त्यांनी जमा केले आहेत.  त्यांचा हा संगीत प्रवाह त्यांच्या वयाबरोबरच वृद्धींगत होवो, हिच सदिच्छा…

सई बने…

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: DSP india Singer south telgu
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.