‘नाटू-नाटू’ गाण्याने घडवला इतिहास; सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार जाहीर !
प्रत्येक कलाकाराच स्वप्न असतं की आपण केलेल काम सर्वात मोठ्या, महत्वाच्या आणि नावजलेल्या ऑस्कर अवॉर्ड साठी पोहचाव. आजचा दिवस हा भारतासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. भारतीय चित्रपट RRR मधील ‘नाटू-नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. त्याबरोबरच भारतीय चित्रपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे. या आधीही ‘नाटू-नाटू’ या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला होता. या गाण्याला आणि डॉक्युमेंट्रीला मिळालेला पुरस्कार हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.आज सोमवारी सकाळी साडेपाच वाजता लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा सुरू झाला.(Natu Natu Song)
यंदाच्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कारसोहळ्यात भारताने आपली जादू दाखवली, तर गायक राहुल सिप्लीगंज आणि काला भैरवा यांच्या ‘नातू नातू’ या गाण्यावरील सादरीकरणाने थेट प्रेक्षकांनासुद्धा आपल्या तालावर थिरकण्यास भाग पाडले. हा सोहळा आणखी खास बनवण्यासाठी बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण होती, जिने सादरीकरणापूर्वी या दोघांची स्टेजवर ओळख करून दिली. राहुल आणि काला भैरवा यांच्या गाण्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यावेळी संगीतकार एमएम कीरवानी आणि अभिनेते राम चरण आणि एनटीआर ज्युनिअर देखील उपस्थित होते. ऑस्कर अकादमीने २८ फेब्रुवारी रोजी ट्विट करत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये नाटू नाटूचे सादरीकरण केले जाणार यादसंदर्भात घोषणा केली होती. ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली होती.
याआधी या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आलेले आहे. आरआरआरच्या ऑस्कर नामांकनाची घोषणा झाल्यापासून सिनेमाच्या संपूर्ण टीमसह प्रत्येक भारतीय आजच्या दिवसाची वाट पाहत होते आणि अखेर हां मानाचा तुरा भारतीयांच्या पारड्यात पडला.तब्बल १४ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लगान ऑस्करच्या शर्यतीत होता. मात्र त्यावेळी भारताच्या पदरी निराशा आली होती.(Natu Natu Song)
====================
हे देखील वाचा:
====================
‘नाटू-नाटू’ हे मूळचे आरआरआरसाठी एमएम कीरवानी यांनी संगीतबद्ध केलेले गाणे होते आणि याच तेलुगू वर्जन राहुल सिप्लीगंज आणि काला भैरवा यांनी गायल होत. चंद्रबोस यांनी हे गाणे गीते लिहिल होत. रामराजू (राम चरण), भीम (एनटीआर ज्युनिअर) आणि सहाय्यक भूमिका एडवर्ड (एडवर्ड सोननब्लिक) यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे ऑगस्ट २०२१ मध्ये युक्रेनमधील किव येथील मरिन्स्की पॅलेसमध्ये चित्रित करण्यात आले होते.