
Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण आधी वाचवला इतरांचा जीव
अहमदाबादमध्ये १२ जून २०२५ रोजी झालेल्या प्लॅन क्रॅशच्या घटनेतून कुणीच अजून सावरलं नाही आहे. २५० पेक्षा अधिक शव सापडले असून यात विमानातील प्रवासी, क्रु मेंबर, पायलट, रहिवासी आणि डॉक्टरांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला निघालेलं हे विमान उड्डानाच्या अवघ्या काही अंतरावर जाऊन मेडिकल कॉलेजवर जाऊन आदळलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं… दरम्यान, ही पहिली प्लॅन क्रॅश दुर्घटना नसून यापूर्वीही भारतात असे दुर्दैवी अपघात झाले आहेत. २००१ मध्ये नाशिकहून मुंबईला येणाऱ्या एका खासगी विमानाचा अपघात झाला होता आणि त्यात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेतेही प्रवास करत होते. अपघातात त्यांना दुखापत होऊनही ते प्रवाश्यांची मदत करत होते… कोण होता तो रिअल लाईफ हिरो जाणून घेऊयात…(Airplane Crash In India)

तर, २००१ मध्ये नाशिकवरुन मुंबईला एक खासगी विमान जात होतं… बहादुरी या गावाजवळ हे विमान रात्री कोसळलं आणि परिस्थिती गंभीर झाली… तांत्रिक बिघाडामुळे अपघात झालेल्या या विमानात इतर प्रवाश्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) देखील प्रवास करत होते… हे विमान गावातील शेतात क्रॅश झालं आणि आग लागली… एअर ट्रॅफिक कंट्रोलला याबद्दल माहिती दिली… मात्र सरकारी मदत येईपर्यंत गावकऱ्यांनीच आगीत अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवले… सुनील दत्त यांनी स्वत:ला तिथून बाहेर काढण्यापूर्वी सहप्रवाशांना बाहेर आणण्यास मदत केली…

दत्त यांनाही दुखापत झाली होती मात्र, बचावकार्यात त्यांनी आपलं दुखणं बाजूला ठेवून रिअल लाईफ हिरो बनूव सगळ्यांची मदत आधी केली…विमान अपघातात जखणी झालेल्या लोकांना नाशिकच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि सुनील दत्त यांना थेट मुंबईला आणलं…(Bollywood news)
================================
=================================
दरम्यान सुनील दत्त यांच्या अभिनयाची कारकिर्द अमाप आहे…. आजवर त्यांनी अनेक अजरामर कलाकृती प्रेक्षकांना दिल्या आहेत. ५०च्या दशकापासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सुनील दत्त यांनी ब्लॅक अॅंड व्हाईट ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा चित्रपटाचा प्रवास पाहिला आणि अनुभवला आहे… ‘किस्मत का खेल’, ‘मदर इंडिया’, ‘साधना’, ‘सुजाता’, ‘हम हिंदुस्थानी’,’में चुप रहूंगी’, ‘मुझे जिने दो’, ‘गुमराह’, ‘आज और कल’, ‘बेटी बेटे’, ‘खांदान’, ‘रॉकी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या…(Sunil Dutt Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi