Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!
आपण जेव्हा एखादा चित्रपट पाहतो तेव्हा आपल्यासमोर एकतर असतात हिरो-हिरोईन्स आणि इतर सहाय्यक कलाकार… याच्यापुढे चित्रपट अनेकांना बऱ्याचदा माहित नसतो. एखादा सिनेमा पाहिल्यावर काही जणांना लेखक-दिग्दर्शकाचं कौतुक वाटतं… तर काही जणांना चित्रपटाचं संगीत भावतं.. पण कोणताही सिनेमा बनवण्यासाठी एक टेक्निकल टीम दिवस-रात्र काम करत असते हे विसरुन चालणार नाही. लाईट बॉय पासून सेट्स उभारणारे कामगारसुद्धा या चित्रपटाचा महत्वाचा भाग असतात. यामध्येच एक अशी गोष्ट असते, जी चित्रपटाला त्याचं खरं रूप देते, तिला म्हणतात सिनेमेटोग्राफी. मराठीत याला आपण छायांकन असतो. चित्रपटात जितका एखाद्या हिरोचा अभिनय महत्त्वाचा असतो तितकीच ही सिनेमेटोग्राफी महत्त्वाची असते. आणि सिनेमेटोग्राफी विश्वात एक असं मराठी नाव आहे, ज्याने आपल्याला अनेक कल्ट मराठी सिनेमे तर दिलेच आहेत, पण त्यासोबत हिंदीमध्येही आपलं टॅलेंट दाखवलं आणि ते ग्रेट सिनेमेटोग्राफर म्हणजे महेश लिमये (Mahesh Limaye)…

तर, याच महेश लिमये यांनी संजय लीला भन्साळींपासून बऱ्याच हिंदीतील ग्रेट मेकर्ससोबत कामं केली. आणि आता याच मराठी माणसाच्या खांद्यावर बॉलिवूडचा पहिला बिग बजेट चित्रपट आहे. तो चित्रपट म्हणजे नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana)… जवळपास ४००० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाच्या सिनेमॅटॉग्राफीची जबाबदारी महेश लिमये यांच्यावर आहे. आता भारताचा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट बनतोय आणि त्याचं इतकं महत्त्वाचं काम तुमच्याकडे येतंय, म्हणजे प्रेशर असेलच की… आता ते महेश यांनाच माहिती पण ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे. महेश लिमये यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अनेक नावाजलेल्या सिनेमेटोग्राफर्ससोबत काम केलं आणि आता ते स्वत: एक नावाजलेले सिनेमेटोग्राफर झाले आहेत. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी २००४ साली आलेल्या ‘उत्तरायण’ चित्रपटापासून केली होती. त्यानंतर त्यांच्याकडे हिंदी प्रोजेक्ट्स आले. खासकरून मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सिनेमेटोग्राफी केली. यामध्ये ‘कॉर्पोरेट’, ‘ट्राफिक सिग्नल’, ‘फॅशन’, ‘हिरोईन’ हे चित्रपट होते. (Entertainment News)

मराठी चित्रपटांबाबत सांगायचं झालं तर ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘येल्लो’, ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘फुलवंती’, ‘धर्मवीर २’ अशा अनेक मोठ्या चित्रपटांची सिनेमेटोग्राफी त्यांनी केली आहे. ‘येल्लो’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला. भाईजान ‘सलमान खान’चा (Salman Khan) ‘दबंग‘ तर तुम्हाला माहितीच असेल. ‘दबंग १’, ‘दबंग २’ आणि ‘दबंग ३’ तिघांची सिनेमेटोग्राफी महेश लिमये यांनीच केलेली आहे. त्यांच्या कलाकारीची भुरळ संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासारख्या दिग्ग्दाज दिग्दर्शकालाही पडली आणि आपल्या ‘हिरामंडी’ (Heeramandi) या बिग बजेट नेटफ्लिक्स सिरीजसाठी त्यांनी महेश लिमये यांची निवड केली. पण यानंतर आता त्यांच्याकडे असा चित्रपट आला आहे, जो हॉलीवूडला केवळ टक्कर देणार नाहीये, तर हॉलीवूडलाही तोंडात बोट घालायला भाग पाडणार आहे. नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाचं बजेटच अवाक करणारं आहे. त्यासोबतच यामध्ये विविध इंडस्ट्रीजच्या स्टार्सची मांदियाळी आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहेत तर साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत आहे. नुकताच याचा एक ग्लीम्प्स टीजर आला होता. त्यामुळे महेश लिमये यांची जादू फक्त भारतात नाही तर अख्ख्या जगात पोहोचणार आहे. (Big Budget Film Of Bollywood)
================================
हे देखील वाचा : Ramayana वर आधारित दाक्षिणात्य कलाकृतींचा भांडार!
================================
बरं अनेकांना सिनेमेटोग्राफी म्हणजे काय हे माहिती नसेल. तर त्यांच्यासाठी सोप्या शब्दात जाणून घेऊयात. एखादा चित्रपट, वेब सिरीज किंवा जाहिरातीमध्ये सीन कसा दिसेल याची कला किंवा तंत्र म्हणजे सिनेमेटोग्राफी (Cinematography)… म्हणजे कॅमेऱ्यामध्ये काय दिसेल, कसं दिसेल आणि प्रेक्षकांना काय जाणवेल, त्यांच्यावर ठराविक सीनचा कसा प्रभाव पडेल, हे सगळं ठरवण्याचं काम सिनेमेटोग्राफरचं असतं. दिग्दर्शक हा सिनेमाची गोष्ट सांगतो आणि सिनेमेटोग्राफर ती गोष्ट आपल्याला दाखवतो… सेटवर सर्वात जास्त कामात व्यस्त कोणी असेल तर तो सिनेमेटोग्राफर ! आता यामध्ये काय काय असतं. तर कॅमेरा अॅंग्लस आणि मुव्हमेंटस म्हणजे कॅमेऱ्यातून वरून, खालून, क्लोज-अप, वाईड शॉट कसे घ्यायचे आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रकाशयोदना… उजेड, सावली, अंधार.. डीम लाईट वगैरे… अजून एक म्हणजे फ्रेमिंग… त्या ठराविक फ्रेममध्ये कोण कुठे दिसेल. त्याशिवाय त्या सीनचा कलर टोन कसा असेल, डार्क, ब्राईट… या सगळ्या गोष्टी सिनेमेटोग्राफरच्या असतात आणि म्हणून तो चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो अगदीच हिरो आणि डिरेकटर इतका… आता ‘रामायण’मध्ये निश्चितच आपल्याला आपल्या मराठी माणसाची जादू अनुभवायला मिळणार एवढ नक्की!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi