ऐश्वर्या राय बच्चनने नाकारलेले पाच चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का??
आपल्या सौंदर्याने आणि अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी आणि 1994 मध्ये विश्वासुंदरी किताब पटकवणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही कायमच आपल्या लुक्स आणि अभिनयामुळे चर्चेत असते. केवळ भारतातच नव्हे तर बाहेरच्या देशात सुध्दा तिने एक महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम अश्या खूप चित्रपटांमध्ये तिचे काम कौतुकास्पद आहे… काही काळ वयक्तिक जबाबदऱ्यांमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात तिचे सिनेमे पाहायला मिळाले नसले तरी अधूनमधून मीडियामध्ये तिचे फोटो व्हायरल होत असतात.
या सगळ्या अभिनयाच्या प्रवासात असे 5 चित्रपट आहेत ज्यांना ऐश्वर्याने नकार दिलाय
चला तर मग जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल
1. दिल तो पागल है (1997)- (Dil To Pagal Hai)
बॉलीवूड चा बादशाह शाहरुख खान आणि नृत्यात तरबेज असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेत्री करिष्मा कपूर यांचा ‘दिल तो पागल हे’ हा सिनेमा खूपच सुपरहिट झाला… एका इंटरव्ह्यू मध्ये ऐश्वर्याने सांगितले की ‘राजा हिंदुस्थानी’ आणि ‘दिल तो पागल हे’ या चित्रपटांसाठी तिला विचारण्यात आले होते.. तिने असेही सांगितले की यश जी(यश चोपडा) ची खूप इच्छा होती की मी ‘दिल तो पागल हे’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करावे. आपल्याला ‘दिल तो पागल हे’ हे सिनेमा चे नाव जरी माहिती असले तरी ‘मैने तो मोहोब्बत करली’ असे या चित्रपटाचे नाव ठरविण्यात आले होते.
2. दोस्ताना (2008)- (Dostana)
दोस्ताना या सिनेमात अभिषेक बच्चन आणि जॉन इब्राहम बरोबर प्रियांका चोप्रा ने काम केले असले तरी ह्या सिनेमासाठी ऐश्वर्या ला विचारण्यात आले होते.परंतु ‘माझा आणि अभिषेक चा रोमान्स प्रेक्षकांना दिसावा असे मला वाटत नाही किंवा सिनेमा संपताना मी दुसऱ्या पुरुषाला निवडले ज्यामुळे गैरसमज होऊ शकतात’ म्हणून मी हा सिनेमा नाकारला असे ऐश्वर्या ने म्हटले आहे.
3. कुछ कुछ होता है (1998)- (Kuch Kuch Hota Hai)
विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिला ‘कुछ कुछ होता है’या चित्रपटासाठी सुद्धा विचारण्यात आले होते.. चित्रपटामध्ये ‘टीना’ या भूमिकेसाठी तिला विचारण्यात आले. 1999 साली एका इंटरव्ह्यू मध्ये ऐश्वर्याने खुलासा केला की मी जर ही भूमिका स्वीकारली असती ‘मॉडेलिंग करताना जे रुटीन असते तेच ही बॉलिवूड मध्ये करत आहे. केस स्ट्रेट करा, मिनी कपडे घाला, मेकअप करा आणि कॅमेरा समोर उभे राहा असे लोकांनी मला हिणवले असते जे मला नको होते’ ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाच्या रिलीज नन्तर टीना ही भूमिका राणी मुखर्जी ने साकारलेली आपण बघितली.
4.राजा हिंदुस्तानी (1996)- (Raja Hindustani)
‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटासाठी ऐश्वर्याला विचारण्यात आले होते..परंतु ऐश्वर्याच्या नकारांनंतर ही भूमिका करिष्मा कपूर ने साकारली ज्यामुळे बॉलीवूड मध्ये परफेक्ट ऍक्टरेस म्हणून करिष्मा कपूर नावाजली जाऊ लागली.
5.मुन्ना भाई MBBS (2003)- (Munna Bhai M.B.B.S.)
संजय दत्त आणि बोमन इरानी कास्ट असलेल्या मुन्नाभाई MBBS या चित्रपटासाठी सुद्धा ऐश्वर्या ला विचारण्यात आले होते..परंतु या चित्रपटासाठी तिने नकार का दिला याची कारणे समोर आलेली नाहीत..
संकलन: अमृता आपटे