दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
आवर्जून पाहाव्यात अशा मराठीमधील ६ रोमँटिक वेबसीरिज
‘विकेंड; म्हटल्यावर प्रत्येकाचेच काही ना काही प्लॅन्स असतातच. पण आता पावसाची चाहूल लागल्यामुळे अनेकांना विकेंड घरात बसूनच काढावा लागतो. काहीजण पावसात मुद्दामहून बाहेर जायचं टाळतात तर, काहींना इच्छा असूनही नाईलाजाने घरात बसावं लागतं. पावसाळ्यातल्या रोमँटिक वातावरणात घरात बसून विकेंड एन्जॉय कसा करायचा, हा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर, ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी तुमचा प्रश्न सोडवला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील या ६ रोमँटिक मराठी वेबसिरीज तुमचा कंटाळवाणा विकेंड सुसह्य करतील. (Romantic Marathi Web Series)
१. आणि काय हवं (Aani Kay Hava)
मराठीमधील लोकप्रिय जोडपं म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही हिट असणाऱ्या या जोडीची रोमँटिक कॉमेडी वेबसिरीज म्हणजे ‘आणि काय हवं’. या वेबसिरीजचे एकूण ३ सिझन प्रदर्शित झाले आहेत. आणि तिन्ही सिझन लोकप्रिय ठरले आहेत. प्रत्येक विवाहित जोडप्याने आवर्जून बघावी अशी ही वेबसिरीज ‘MX प्लेअर’वर उपलब्ध आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही ही वेबसिरीज एकदम फ्री मध्ये बघू शकता.
२. डी 7 (D 7)
सध्याच्या तरुणाईमध्ये लग्न या संकल्पनेबद्दल एकूणच अनास्था आढळते. पण त्याच वेळी ते लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय मात्र मोकळेपणाने स्वीकारताना दिसत आहेत. D7 या वेबसिरीजमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. ही वेबसिरीज रोमँटिक -कॉमेडी वेबसिरीज आहे. सीरिजचे एकूण ८ भाग असून ती ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. (Romantic Marathi Web Series)
३. वन्स अ इयर (Once a Year)
“निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असणारी ‘वन्स अ इयर’ या वेबसिरीजमध्ये कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडलेल्या जोडप्याचा सहा वर्षांचा रोमँटिक प्रवास दाखवण्यात आला आहे. या एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या गोड जोडप्यांच्या आयुष्यात कोणती वळणं येतात, ते पुढे एक होतात की विभक्त होतात? त्यांच्यामधले प्रेम कायम राहते का? असे अनेक प्रश्न सिरीज दरम्यान पडतात आणि अर्थात त्याची उत्तरंही आपल्याला मिळतात. सीरिजचे एकूण ६ भाग असून ही सिरीज ‘MX प्लेअर’वर फ्रीमध्ये बघता येईल.
४. सोप्पं नसतं काही
ही सिरीज एका बोल्ड विषयावर आधारित आहे. एक मुलगी आणि दोन मुले, हा प्रेम त्रिकोण नसून. दोन्ही मुलांवर प्रेम करणारी मुलगी तिला कोणासोबत राहायचे हे ठरवू शकत नाही, म्हणून ही तिघंजणं एकत्र राहायचा जगावेगळा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयामध्ये कोणतेही शारीरिक आकर्षणाबद्दल नाही, तर केवळ भावनिक ओढ आहे. यामध्ये मृण्मयी देशपांडे, अभिजित खांडकेकर, शशांक केतकर, आनंद इंगळे, प्रदीप वैद्य, रुपाली वैद्य इ. कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सीरिजचे एकूण ५ भाग असून ही सिरीज ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. (Romantic Marathi Web Series)
५. अधांतरी
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आलं आहे. त्यामुळे आजकाल ‘व्हर्च्युअल रिलेशनशिप’ नावाचा नवीन प्रकार अस्तित्वात आला हे. प्रेमाचं काय ते कसंही, कधीही आणि कुठेही होऊ शकतं. अनेकजण ‘ऑनलाईन’ प्रेमात पडतात आणि मग निर्माण होते ‘लॉंग डिस्टन्स रिलेनशिप’. अधांतरी ही वेबसिरीज अशाच लॉंग डिस्टन्स रिलेशशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची कहाणी आहे. या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे या फ्रेश आणि एनर्जेटिक जोडीचा ‘लॉंग डिस्टन्स रोमान्स’ बघायला मिळणार आहे. सीरिजचे एकूण ८ भाग असून ‘MX प्लेअर’ वर अगदी मोफत बघता येईल. (Romantic Marathi Web Series)
===========
हे देखील वाचा – ‘हे’ मराठी चित्रपट अडकले होते वादाच्या भोवऱ्यात
===========
६. सेव्हन लव्ह
सेव्हन लव्ह ही वेबसिरीज आरुषच्या आयुष्यात घडणाऱ्या विचित्र गोष्टींवर आधारित आहे. इशितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आरुषला आयुष्यात एका विचित्र प्रकाराला सामोरं जावं लागतं. असं काही घडतं की, आरुष सहा स्त्रियांसह एका विचित्र परिस्थिती सापडतो. या सहा जणी एकमेकांपेक्षा संपूर्णपणे वेगळ्या असतात. एक सुंदर पण मूर्ख, दुसरी निष्पाप मुलाखत घेणारी मुलाखतकार, तिसरी दु:खी विवाहित स्त्री, चौथी श्रीमंत सेक्स वर्कर, पाचवी संस्कारी मुलगी आणि सहावी अभिनेत्री. या सर्वजणी आरुषचं अटेन्शन मिळविण्यासाठी धडपडत असतात. पण आरुषला मात्र त्यांच्यापैकी एकीचीच निवड करायची असते. सिरीजमध्ये काही अश्लील व द्वयर्थी भाषा व दृश्य आहेत. सीरिजचे एकूण ७ भाग असून ‘MX प्लेअर’ वर केव्हाही फ्री मध्ये बघता येईल.