दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
2022 मध्ये देशभक्तीचा महापूर- भारतीय सैनिकांच्या आयुष्यावर आधारित तब्बल 7 चित्रपट
पूर्वी साधारणतः १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला टीव्हीवर देशभक्तीपर चित्रपट दाखवले जात असत. कारगील युद्ध, २६/११ अटॅक अशा अनेक घटनांनंतर देशात देशभक्तीपर चित्रपटांचं मार्केट वाढू लागलं देशभक्तीवर आधारित एखादा चित्रपट लागला की देशभक्तीचे वातावरण तयार होते.
आजवर देशभक्तीवर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. आता चालू वर्षात (२०२२) येऊ घातलेल्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Upcoming Patriotic Movies in 2022)
१. अटॅक
दिग्दर्शक: लक्ष्य राज आनंद
कलाकार: जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस, रकुलप्रीत सिंग
या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून जॉनची ॲक्शन भूमिका त्यातून दिसून येत आहे. या चित्रपटात जॉन एक सुपर सैनिक बनला असून, तो देश वाचवण्याच्या मोहिमेवर निघालेला आहे. या टीझरमध्ये लोखंडी पोशाख परिधान केलेला एक माणूस सैनिक व पोलिसांवर गोळीबार करताना दिसत आहे.
हा चित्रपट २८ जानेवारी २०२२ प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख ती पुढे ढकलण्यात आली आहे. (Patriotic Movies in 2022)
२. मेजर
दिग्दर्शक: शशी किरण टिक्का
कलाकार: आदिवी शेष, शोभिता धुलिपाला, सई मांजरेकर
२६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन हे शहीद झाले होते. या चित्रपटात त्यांचा लहानपानपासूनचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यांनी टीमला कोणताही धोका पोहोचू न देता स्फोटाच्या तपासाची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती. टीझरच्या शेवटी ‘उठू नकोस, मी सांभाळून घेईन’ हे संदीप यांनी बोललेले शब्द कानात गुंजत राहतात.
हा चित्रपट हिंदी सोबतच तेलगू भाषेत पण रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात अदिवी शेषने प्रमुख भूमिका निभावली आहे. त्याला शोभिता धुलिपाला, सई मांजरेकर, प्रकाशराज आणि रेवती सहकलाकारांनी साथ दिली आहे. या चित्रपटासाठी १२० दिवस शूटिंग करण्यात आले असून त्यासाठी ७५ लोकेशन्सचा वापर करण्यात आला आहे.
3. सॅम बहादूर
दिग्दर्शक: मेघना गुलजार
कलाकार: विकी कौशल, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख
सॅम बहादूर चित्रपटातून लष्कराच्या अधिकाऱ्याची कथा सांगण्यात येणार आहे. भारतीय लष्कराचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याबद्दल चित्रपटातून माहिती देण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी देशभक्तीवर आधारित असणारा राझी चित्रपट अतिशय सुंदर पद्धतीने दिग्दर्शित केला होता.
या चित्रपटात विकी कौशलने प्रमुख भूमिका केली आहे. सॅमच्या पत्नीच्या भूमिकेत सानिया मल्होत्रा, तर इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा शेख दिसणार आहे. (Patriotic Movies in 2022)
४. तेजस
दिग्दर्शक : सर्वेश मेवारा
कलाकार: कंगना राणावत
तेजस चित्रपटात प्रमुख भूमिकेत कंगना राणावत असणार आहे. तिने सोशल मीडियावर चित्रपटाशी संदर्भातील एक फोटो शेअर केला आहे. कंगना या चित्रपटात तेजस गिल नावाच्या फायटर वैमानिकीची भूमिका निभावताना दिसणार आहे.
हा चित्रपट महिलांना सैन्यात सामील करून घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयासंदर्भात तयार करण्यात आला आहे. हवाई दलात महिलांचा समावेश करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आला होता. त्यावर हा चित्रपट आधारलेला आहे.
२०२१ वर्षाचा डिसेंबर महिन्यात निर्मात्यांनी अशी घोषणा केली होती की, हा चित्रपट २२ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित करण्यात येईल.
5. गोरखा
दिग्दर्शक: संजय पूरण सिंह चौहान
कलाकार: अक्षय कुमार
१९७१ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारतीय सैन्याचा विजय झाला होता. हा चित्रपट गोरखा रेजिमेंटचे सैनिक ‘मेजर जनरल इयान कार्डोझो’ यांच्या जीवनपटावर आधारित आहे. अक्षय कुमारने १५ ऑक्टोबरला चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केले होते.
या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. युद्धाच्या वेळी भूसुरुंगात मेजर जनरल इयान यांचा पाय निकामी झाला होता. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांनी जवळ असणाऱ्या खुकरीने आपला पाय कापून टाकला होता. (Patriotic Movies in 2022)
६. पिप्पा
डायरेक्टर: राजकृष्णा मेनन
कास्ट: ईशान खट्टर, मृणाल ठाकुर, प्रियांशु पेनयुली
१९७१ च्या युद्धावर आधारित पिप्पा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ब्रिगेडिअर बलराम सिंग मेहता ‘1971:अ नेशन कम्स ऑफ एज’ या पुस्तकावर हा आहे.
====
हे ही वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…
====
या चित्रपटात शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर हा ब्रिगेडिअर बलराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ईशान शिवाय मृणाल ठाकूर, प्रियांशु पेनियाली आणि सोनी राजदान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Patriotic Movies in 2022)
७. इक्कीस
दिग्दर्शक: श्रीराम राघवन
कलाकार: वरुण धवन
बदलापूर चित्रपटात वरून धवन आणि श्रीराम राघवन यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर ‘इक्कीस’ या चित्रपटातून दोघे परत एकदा एकत्र आले आहेत. हा चित्रपट १९७१ चा लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. १९७१ च्या युद्धात सेकंड लेफ्टनंट अरुण अवघ्या २१ व्या वर्षी शाहिद झाले होते. शहीद झाल्यानंतर त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
====
हे ही वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’चे निर्माते काश्मीर नरसंहाराच्या कहाणीला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज!
====
वरुण दोन वर्षांपासून या चित्रपटाची तयारी करत होता. त्याने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली असून फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Patriotic Movies in 2022)
– विवेक पानमंद