Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

GAADI NUMBER 1760: ७७ वर्षीय अभिनेत्री सुहास जोशींनी सिनेमामध्ये केले चक्क ॲक्शन सीन्स !

 GAADI NUMBER 1760: ७७ वर्षीय अभिनेत्री सुहास जोशींनी सिनेमामध्ये केले चक्क ॲक्शन सीन्स !
मिक्स मसाला

GAADI NUMBER 1760: ७७ वर्षीय अभिनेत्री सुहास जोशींनी सिनेमामध्ये केले चक्क ॲक्शन सीन्स !

by Team KalakrutiMedia 25/06/2025

GAADI NUMBER 1760: तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि त्यातलं रहस्य, थरार, ट्विस्ट्स, आणि दमदार अभिनय पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत. पण या ट्रेलरमधली एक खास गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचा जबरदस्त ॲक्शन अंदाज! (GAADI NUMBER 1760)

GAADI NUMBER 1760

७७ वर्षांच्या असल्या तरी सुहास जोशी यांनी या चित्रपटासाठी काही विशेष अ‍ॅक्शन सीन स्वतः साकारले आहेत. त्यांचं वय, अनुभव, आणि कॅमेऱ्यासमोरचं आत्मभान याचं हे एक अप्रतिम उदाहरण ठरतं. त्यांच्या अभिनयाची आणि जिद्दीची सगळीकडे चर्चा होत आहे. सुहास जोशी यांनी स्वतः सांगितलं की, “वय काहीही असो, जेव्हा एखादी भूमिका मनापासून आवडते, तेव्हा ती पूर्ण ताकदीने निभावावीशी वाटते. या चित्रपटातली माझी भूमिका वेगळी आहे. अ‍ॅक्शन सीन करणं ही माझ्यासाठी एक नवीन आणि उत्साही गोष्ट होती. टीमचा पाठिंबा होता, म्हणून मला अजिबात भीती वाटली नाही.”

GAADI NUMBER 1760

चित्रपटाचे दिग्दर्शक योगिराज संजय गायकवाड म्हणतात, “सुहास मॅडम म्हणजे एक प्रेरणा आहेत. सुरुवातीला आम्ही त्यांच्या अ‍ॅक्शनसाठी बॉडी डबल वापरण्याचा विचार केला होता. पण त्यांनी तो थेट नाकारला आणि सांगितलं, ‘मी स्वतः सीन करणार.’ त्यांच्या आवाजातला आत्मविश्वास पाहून आम्ही थक्क झालो. त्यांच्या जिद्दीमुळे संपूर्ण टीमला एक नवी ऊर्जा मिळाली.”(GAADI NUMBER 1760)

=============================

हे देखील वाचा: All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात !

=============================

‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रसाद खांडेकर, शशांक शेंडे, श्रीकांत यादव आणि अर्थातच सुहास जोशी अशा अनेक दमदार कलाकारांचा सहभाग आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत कैलाश सोराडी आणि विमला सोराडी. चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे आणि त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.  सुहास जोशींची भूमिका काय वळण घेणार? त्यांच्या अ‍ॅक्शन सीन किती रंगतील? हे पाहणं खूपच रंजक ठरेल.या वयातही त्यांनी जे समर्पण दाखवलं आहे, त्यातून अभिनयावरील त्यांची निष्ठा दिसून येते आणि नव्या पिढीला एक प्रेरणादायी संदेशही मिळतो , वय काहीही असो, जेव्हा तुमचं काम तुमचं प्रेम असतं, तेव्हा मर्यादा कुठेच उरत नाहीत!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment GAADI NUMBER 1760 trailer Marathi Movie prasad khandekar prathamesh parab Priyadarshini Indalkar shashank shende Shubhankar Tawde Suhas Joshi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.