Bollywood movies remade in south: या ८ सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे बनले होते दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक!
चित्रपटप्रेमींना जर का तुम्ही विचारलं, तुम्हाला कोणते चित्रपट आवडतात? तर अनेकजण पटकन दक्षिणात्य चित्रपटांबद्दल आवर्जून सांगतात. दाक्षिणात्य चित्रपटांमधील कथा दर्जेदार असल्यामुळे ते सर्वानाच प्रचंड आवडतात. दक्षिणात्य चित्रपट सुपरहिट होत असल्यामुळे ते हिंदीमध्ये डब केले जातात किंवा हिंदी कलाकारांना घेऊन त्या चित्रपटांचा रिमेक केला जातो. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण काही हिंदी चित्रपट असे आहेत की, त्या चित्रपटांचे दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक बनविण्यात आले आहेत (Bollywood movies remade in south). अर्थात, अशा सर्वच चित्रपटांची माहिती देणं शक्य नसलं, तरी निवडक ८ चित्रपटांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
दक्षिणेत रिमेक झालेले ८ बॉलिवूडचे चित्रपट (Bollywood movies remade in south)
१. थ्री इडियट्स
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला आहे. या चित्रपटात अमीर खान याने प्रमुख भूमिका केली होती. तामिळ भाषेत ‘ननवार’ नावाने या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत विजय सेतुपती आहे. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता.
या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तीन मित्रांच्या मैत्रीची कहाणी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं आहे. २०१७ साली या चित्रपटाचा मेक्सीकन रिमेक पण करण्यात आला होता. मेक्सिकन चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
२. जॉली एलएलबी
अर्शद वारसीची मुख्य भूमिका असणाऱ्या जॉली एलएलबी या चित्रपटाचे दोन भाषांमध्ये रिमेक आले आहेत. तामिळ भाषेमध्ये ‘मनीथन’ नावाने या चित्रपटाला प्रदर्शित करण्यात आले होते, तर तेलगू भाषेत आलेल्या ‘सप्तगिरी एलएलबी’ चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाचा आशय चांगला असल्यामुळे त्याचे रिमेक पण प्रचंड लोकप्रिय ठरले.
या चित्रपटाची सुरुवात जगदीश वकिलापासून होते. तो एका मोठ्या केसमध्ये हात घालतो. त्या केसमध्ये त्याच्या विरुद्ध एक प्रसिद्ध वकील असतो. या चित्रपटाचा दुसरा भाग पण आला होता, पण म्हणावा तेवढा तो चालला नाही. (Bollywood movies remade in south).
३. दिल्ली बेल्ली
‘दिल्ली बेल्ली’ हा चित्रपट म्हणजे अनलिमिटेड एंटरटेनमेंट! असे चित्रपट फार कमी बनतात आणि ते येतात तेव्हा धुमाकूळ घालून जातात.
हा चित्रपट तस पाहायला गेले तर अठरा वर्षांवरील लोकांसाठी बनवण्यात आला असल्याने त्याला A सर्टिफिकेट देण्यात आले होते. हे सर्टिफिकेट देऊनही इंडियन सेन्सॉर बोर्डाने ७५ कट्स या चित्रपटावर लावले होते. हे कमी की काय म्हणून नेपाळ देशात पण या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटाचा तमीळ रिमेक ‘सहाय’ नावाने आला होता.
४. ‘प्यार का पंचनामा’
बॉलिवूडमधील दिग्ग्ज अभिनेता कार्तिकार्यनचा पदार्पणातील पहिला चित्रपट असणाऱ्या ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. तीन मित्र आणि त्याच्या गर्लफ्रेंड यांच्याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची मांडणी वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. तेलगूमध्ये ‘सिग्नल’ नावाने या चित्रपटाचा रिमेक आला होता. पण तो चित्रपट तिकीटबारीवर जोरात आपटला.
====
हे देखील वाचा: चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण
====
५. ‘अ वेन्सडे’
बॉलिवूडमध्ये खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटांमधील एक म्हणजे ‘अ वेन्सडे’ हा चित्रपट. यातील खलनायक आणि पोलीस दोन्ही भूमिका दर्जेदार झाल्या आहेत. या चित्रपटावरून ‘उनाईपूल ओरुवन’ नावाचा तमिळ रिमेक आला होता. तसेच ‘इनाडू’ नामक तेलगू रिमेक पण आला होता. या दोन्ही चित्रपटांमध्ये कमल हसन यांनी खलनायकी भूमिका केली आहे. तेलगू आणि तामिळ दोन्ही चित्रपटांची एकाच वेळी शूटिंग झाली होती.
६. दबंग
बॉलिवूड मधील सर्वांच्या लाडक्या सलमान खानच्या चित्रपटांचे चक्क दक्षिणात्य प्रादेशिक भाषांमध्ये रिमेक करण्यात आले आहेत. सलमानच्या चित्रपटांचे रिमेक म्हटल्यावर आपले डोळे विस्फारले ना? पण हो,हे खरं आहे. दबंग चित्रपटाचा तमिळ भाषेत ‘ओष्ठे’ नावाने रिमेक करण्यात आला आहे, तर तेलगू भाषेत ‘गब्बर सिंग’ नावाने रिमेक करण्यात आला आहे. गब्बर सिंग चित्रपटात पवन कल्याण आणि श्रुती हसन या दोघांनी प्रमुख भूमिका निभावली आहे.
७. ओह माय गॉड
बॉलिवूडमध्ये येणारे काही चित्रपट कुटुंबासोबत बसून पाहावे असे असतात. त्यातील ‘ओह माय गॉड’ नावाचा एक चित्रपट येऊन गेला आहे. त्यात चक्क एक व्यक्ती देवाच्या विरोधात केस ठोकते. त्याच्या दुकानाचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेले असते. यात अक्षय कुमार आणि परेश रावल हे प्रमुख भूमिकेत आहेत.
ओह माय गॉड चित्रपटाच्या तेलगू रिमेकमध्ये व्यंकटेश आणि पवनकुमार असून त्या चित्रपटाचे नाव ‘गोपाला गोपाला’ आहे, तर कन्नड भाषेतील चित्रपटात मुकुंद मुरारी आणि सुदीप हे प्रमुख भूमिकेत आहेत.
८. मुन्ना भाई एमएमबीबीएस
‘मुन्ना भाई एमएमबीबीएस’ या चित्रपटाची पण एक वेगळीच हवा होती. सर्किट नावाची भूमिका सर्वानाच आवडली होती. हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला होता. तमिळ भाषेत कमल हसन यांनी ‘वसूल राजा एमएमबीबीबीएस’ मध्ये तर तेलगू मध्ये चिरंजीवीने ‘शंकरदादा एमएमबीबीएस’ चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. कन्नड भाषेत पण ‘उडपी दादा एमएमबीबीएस’ नावाने हा चित्रपट आला होता. तेलगू आणि तमिळ भाषेतील सिनेमांनी जरी कमाई केली असली, तरी कन्नडमधील चित्रपट मात्र फ्लॉप गेला.
====
हे देखील वाचा: संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) काळाच्या पडद्याआड!
====
आपण पाहिलेल्या बॉलिवूड चित्रपटांचे दक्षिणात्य चित्रपटांमध्ये रिमेक आले आहेत, तर दक्षिणात्य चित्रपटांचे बॉलिवूड रिमेक पण मोठ्या पहिले जातात (Bollywood movies remade in south). दाक्षिणात्य चित्रपटांना महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग मिळतो. मराठी चित्रपट पण काही दिवसात दक्षिणेकडील चित्रपटांमधून डबिंग झाले तर नवल नको वाटायला!
– विवेक पानमंद