दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बॉलिवूडच्या या 9 सेलिब्रेटीजना होळी खेळायला अजिबात आवडत नाही
सध्या सर्वजण होळीच्या रंगात न्हाऊन निघत असताना त्याला बॉलिवूड अपवाद कसं असेल. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोनाचं सावट हटल्यावर सर्वजण होळी खेळायला उत्सुक आहेत. बॉलिवूडमध्ये तर कित्येक सेलिब्रेटींच्या घरी होळी साजरी केली जाते. पण काही कलाकार असे आहेत ज्यांना होळी खेळायला अजिबात आवडत नाही. हे कलाकार कुठले? चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. (Bollywood Celebrities)
१. टायगर श्रॉफ
वॉर चित्रपटात हृतिक रोशन सोबत “जय जय शिवशंकर, आज मूड है भयंकर” म्हणत गुलाल उधळत थिरकणाऱ्या टायगर श्रॉफला प्रत्यक्षात मात्र होळी खेळायला अजिबात आवडत नाही. कारण त्याला वाटते की, हा पाण्याचा अपव्यय आहे. तसंच त्याला रंगही आवडत नाहीत कारण त्यामध्ये हानिकारक केमिकल्स मिसळलेली असतात.
२. जॉन अब्राहम
जॉन अब्राहमला होळी खेळायला अजिबात आवडत नाही कारण त्याला असे वाटते की केमिकलयुक्त रंग केवळ आपल्यासाठीच नाही, तर संपूर्ण पृथ्वीसाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने नुकसानकारक असतात. तसेच होळी सेलिब्रेशनचा गैरफायदा घेऊन काही पुरुष महिलांशी सलगी करतात, ही अत्यंत संतापजनक गोष्ट असते. त्यामुळे त्याला होळीचा खेळच आवडत नाही.
३. रणबीर कपूर
ये जवानी है दिवानी या चित्रपटात “बलम पिचकारी जो तुने मुझे मारी” या सुप्रसिद्ध गाण्यामध्ये अत्यंत उत्साहाने होळी खेळणाऱ्या रणबीर कपूरला प्रत्यक्षात मात्र होळी खेळायला अजिबात आवडत नाही. त्याला रंग खेळायला अजिबात आवडत नसल्यामुळे या गाण्याच्या शूटिंगदरम्यान तो प्रचंड अस्वस्थ होता. दरवर्षी कपूर कुटुंबातर्फे होळीची सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली जाते. परंतु, यामध्ये तो कधीच दिसला नाही. (Bollywood Celebrities)
४. करीना कपूर खान
कपूर खानदानातली अजून एक व्यक्ती आहे जी होळी खेळत नाही, ती व्यक्ती म्हणजे करीना कपूर – खान. पण यामागचं कारण काहीसं वेगळं आहे. करीना होळी न खेळण्याचं कारण म्हणजे तिचे आजोबा पृथ्वीराज कपूर. पृथ्वीराज कपूर बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी दरवर्षी सर्वात मोठी होळी सेलिब्रेशनची पार्टी आयोजित करायचे. त्यावेळी करीना आवडीने होळी खेळत असे. परंतु, त्याच्या मृत्यूनंतर तिने होळी खेळणे बंद केले कारण होळी खेळताना ती आजोबांच्या आठवणीने अस्वस्थ होते. (Bollywood Celebrities)
५. श्रुती हसन
श्रुती हसनला होळी खेळायला अजिबात आवडत नाही कारण पाण्याचा होणारा अपव्यय. तिच्या मते पाणी टंचाई असताना पाण्याचा अपव्यय करणं अत्यंत चूक आहे. शिवाय तिची त्वचा खूप संवेदनशील असल्यामुळे तिला रंगांमधल्या केमिकल्सची भीती वाटते.
६. अथिया शेट्टी
अथिया शेट्टी एक इको फ्रेंडली व्यक्ती आहे आणि होळी न खेळण्यामागचे तिचे कारण देखील तेच आहे, कारणअथियाच्या मते, होळी खेळणे म्हणजे पाण्याचा अपव्यय आहे, तसेच त्यामुळे कुत्र्यांना व इतर प्राण्यांनाही त्रास होतो तसेच पक्षीही हे केमिकलयुक्त रंग अन्न समजून खातात आणि त्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे तिला होळी खेळायला आवडत नाही. रंगापेक्षा सणाच्या परंपरेचा आदर करायला हवा असं तिचं स्पष्ट मत आहे. (Bollywood Celebrities)
७. सूरज पांचोली
सूरज पांचोलीने पाणी वाचवण्याच्या कारणासाठी होळी न खेळण्याचा निर्णय घेतला. लहानपणी तो आवडीने होळी खेळायचा पण आता पाण्याचा अपव्यय आणि रंगांमधील केमिकल्समुळे होणारे धोके लक्षात आल्याने त्याने नैसर्गीक रंग वापरून पाण्याचा अपव्यय न करता होळी खेळण्याविषयी जागृती करण्याची गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.
८. तापसी पन्नू
तापसी पन्नू होळी खेळत नाही कारण तिच्या घरी तिचे आईवडील होळी खेळत नाहीत. तिला होळी खेळायलाही आवडत नाही असंही नाही पण लहानपणी तिला होळी खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही आणि आता होळीच्या काळात ती दरवर्षी शूटिंगमध्ये व्यग्र असते. (Bollywood Celebrities)
=====
हे देखील वाचा: मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ 4 बहुचर्चित चित्रपट!
=====
९. रणवीर सिंग
रणवीर सिंग होळी खेळत नाही कारण त्याला त्याच्या चेहऱ्यावर रंग लावायला अजिबात आवडत नाही शिवाय अनैसर्गिक रंगांच्या वापरामुळे पयावरण दूषित होते. हे देखील त्याच्या होळी न खेळण्यामागचं अजून एक कारण आहे.
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====