मधु सप्रे: नव्वदच्या दशकात न्यूड फोटोशूट करुन खळबळ माजवणारी ‘सुपरमॉडेल’ सध्या काय करते?
९० च्या दशकात, भारतात मॉडेलिंगची संस्कृती रुजू लागली होती. सर्वत्र मॉडलिंगचे वारे वाहू लागली होते. टीव्ही चॅनेल्स आणि प्रिंट मिडियामध्ये जाहिरातींचा वेग वाढला होता. त्यामुळे मॉडेल्सना जाहिरातींमध्ये जागा मिळत होती. अशीच एक मॉडेल हाेती मधु सप्रे (Madhu Sapre). जिने मॉडेलिंगच्या काळात खूप नाव कमावलं. मात्र तिच्या एका जाहिरातीमुळे तिच्यावर कोर्ट केस दाखल झाली हाेती. जी जवळपास १४ वर्षे चालली. आज मधू सप्रे हिचा वाढदिवस आहे. आज ती पन्नास वर्षांची झाली आहे. १४ जुलै १९७१ मध्ये नागपूरमध्ये मधुचा जन्म झाला हाेता.
काय होती जाहिरात?
१९९५मध्ये ‘टफ’ या शूज कंपनीने ‘प्रिंट ॲड’ शूट केली हाेती. ज्यामध्ये मधु आणि त्या काळातील तरुण मॉडेल आणि आजही फिटनेससाठी प्रसिद्ध असणारे मिलिंद साेमण यांनी ही जाहिरात शूट केली होती. या जाहिरातीत दोघेही ‘न्यूड’ होते. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. फक्त पायात शूज घातले होते आणि ते एकमेकांना चिकटून उभे होते. ही जाहिरात अधिक मसालेदार करण्यासाठी, त्यांच्या अंगावर गुंडाळलेला अजगरदेखील ठेवण्यात आला होता.
त्यावेळी मधु (Madhu Sapre) आणि मिलिंद एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही रंगल्या होत्या. त्यामुळे दोघांनी ही जाहिरात सहज केली असावी असेही लोकांचे मत होते. मात्र ही जाहिरात केल्याने मिलिंद आणि मधूवर खूप टीका झाली. सिनेइंडस्ट्रीत या जाहिरातीमुळे खळबळ उडाली. या जाहिरातीची गणती आजही सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये हाेते.
या जाहिरातीमुळे मुंबई पोलिसांनी ऑगस्ट १९९५ मध्ये मधु व मिलिंदविरोधात गुन्हा दाखल केला होता. शिवाय जाहिरातीत अजगराचा वापर केला म्हणून टीकाही झाली होती. त्यामुळे वाईल्ड लाइफ प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत संबंधित जाहिरात कंपनीविरोधातही गुन्हा दाखल झाला होता. १४ वर्षे हा खटला सुरू होता. शेवटी १४ वर्षांनी मिलिंद व मधु यांना निर्दोष ठरवले गेले.
सुप्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी केली होती निवड
मधु (Madhu Sapre) बोल्डनेससाठी ओळखली जायची. ती सुपरमॉडेल म्हणून नावरूपासत येत होती. मात्र प्रत्यक्षात मात्र ती ॲथलेट होती. ९०च्या दशकात फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष याची नजर मधुवर पडली आणि त्यांनी तिला एका फोटोशूटसाठी निवडले. वयाच्या १९व्या वर्षी मधुने फोटोशूट केले आणि पुढे मॉडलिंग करण्याचा निर्णय घेतला. कमी वयातच मॉडेलिंग करिअरमध्ये पाऊल टाकून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिस इंडियाचा किताब जिंकूनही मधुला ग्लॅमर इंडस्ट्रीत अपेक्षित स्थान मिळवता आले नाही.
फिल्मी करिअरमध्ये मधूला फारसे यश मिळाले नाही. फोटोग्राफर राजाध्यक्षांनीच मधूला मिस इंडिया स्पर्धेचा फॉर्म भरण्यास सुचवले होते. तिने तो फॉर्म भरला आणि तिची निवड झाली. मॉडेल म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या मधुने १९९२ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. मात्र मिस युनिव्हर्स स्पर्धेत एका प्रश्नाच्या उत्तरामुळे तिला आपला मुकुट गमवावा लागला.
कोणता होता तो प्रश्न ?
स्पर्धेतील परीक्षकांनी मधूला तू देशाची पंतप्रधान बनलीस तर काय करशील? असा प्रश्न स्पर्धेच्या फायनल राउंडमध्ये विचारला होता. यावर तिने उत्तर दिले होते, “मी भारतात एक मोठे स्टेडियम बनवणार कारण भारतात खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदाने नाहीत.” या असामान्य उत्तरामुळे मधु मुकुटपासून दूर गेली, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. न्यायाधीशांना हे उत्तर सर्वात कमकुवत वाटले.
या स्पर्धेनंतर मधुने (Madhu Sapre) एका मुलाखतीत सांगितले होते की, पंतप्रधान बनून एका वर्षात देशाची गरिबी हटवता येणार नाही. कदाचित न्यायाधीशांना अशाचं उत्तराची अपेक्षा होती. पण आम्हाला फायनल राउंडमध्ये सांगण्यात आले होते की, जे मनात आहे तेच बोलावे बनावट काही बोलू नये आणि मी मनापासून बोलले. मिस इंडिया झाल्यानंतर मधु सप्रे यांचे मिलिंद सोमणसोबत अफेअर होते. दोघेही जवळपास पाच वर्षे एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये रिलेशनशिपमध्ये होते.
========
हे देखील वाचा – अर्चना जोगळेकरच्या बाबतीत घडला होता ‘हा’ दुर्दैवी प्रसंग
========
पेज ३ पार्टीत कधी कधी झळकते मधू
मधु सप्रेने (Madhu Sapre) २००३ मधे अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफसोबत ‘बूम’ या चित्रपटात काम केले होती. सध्या ती ग्लॅमरच्या जगापासून दूर आहे. पण अधूनमधून भारतातील ‘फॅशन शोज’ आणि ‘पेज थ्री’ पार्टीमध्ये ती दिसत असते. मधुने इटलीतील उद्योजक जिआर मारिया यांच्याशी विवाह केला केले. ती आपल्या कुटूंबियांसह इटलीत स्थायिक झाली असून आपल्या कुटूंबासोबत आनंदी आहे. तिला एक मुलगी आहे. तिचे नाव तिने इंदिरा ठेवले आहे.
अशा या बिनधास्त मधूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
– राजेश्वरी बोर्डे