हिरॉईन: या चित्रपटाने बॉलिवूडची ‘अंदर कि बात’ सर्वांसमोर आणली….
हा तोच चित्रपट आहे ज्यामुळे बॉलिवूडमध्ये एक नवीन वाद उत्पन्न झाला होता. हा तोच चित्रपट आहे ज्यामध्ये नायिकेची ‘प्रेग्नन्सी’ हा विषय वादातीत ठरला आणि थेट कोर्टात पोचला. हा तोच चित्रपट आहे ज्यामुळे मधुर भंडारकर आणि ऐश्वर्या राय या दोघांमध्ये वितुष्ट आलं. हा चित्रपट आहे हिरॉईन (Heroine)!
२०१२ साली आलेला हिरॉईन (Heroine) हा चित्रपट करीनाच्या कारकिर्दीतला एक उत्कृष्ट चित्रपट समजला जातो. स्त्रीप्रधान असणारा हा चित्रपट बॉलिवूडची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आणतो. चित्रपटाची कथा ‘माही’ नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते.
बॉलिवूडची सुपरस्टार असणारी ‘माही’ आणि तिची जीवनशैली साकारताना करिनाने कमालीचा अभिनय केला आहे. माहीचं स्टारडम, तिची अफेअर्स आणि या साऱ्यासोबतच शेवटी जेव्हा कारकिर्दीला उतरती कळा लागते तेव्हा स्टारडम टिकवण्यासाठी तिचं कोणत्याही थराला जाणं अशा अनेक गोष्टींचं यथासांग चित्रण चित्रपटामध्ये केलेलं आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमधली ‘पीआर’ ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोचली. चित्रपट हिट होण्यासाठी काय काय आणि कशा क्लुप्त्या लढवल्या जातात हे चित्रपटामध्ये व्यवस्थितपणे मांडण्यात आलं आहे. मिळालेलं स्टारडम जेव्हा ओसरायला लागतं तेव्हा कलाकारांची होणारी मानसिक घालमेल, स्टारडम टिकविण्यासाठीचा आटापिटा आणि ते करताना बेभान होत अगदी कोणत्याही पातळीवर जाणं या सर्व गोष्टी दाखवताना दिग्दर्शक कुठेही कमी पडलेला नाही.
चित्रपटात करीना कपूर सोबत अर्जुन रामपाल, रणदीप हुडा, संजय सूरी, दिव्या दत्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटामध्ये बॉलिवूडचं आणि स्टार्सच्या आयुष्याचं वास्तववादी दर्शन यामध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपटाचा विषय काहीसा ‘हॉट’ होता, तसंच चित्रपटात ‘गरमागरम’ दृश्यही आहेत. पण या चित्रपटाच्या मेकिंगच्या सुरवातीलाच झालेल्या वादाने संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं होतं आणि चित्रपटाविषयी ‘गरमागरम’ चर्चाही रंगल्या होत्या; त्याबद्दलचं थोडंसं (Lesser Known Facts about Heroine) –
ऐश्वर्या होती पहिली पसंती
चित्रपटातील ‘माही’ या व्यक्तिरेखेसाठी आधी ऐश्वर्या रायची निवड करण्यात आली होती. सुरुवातीचे काही दिवस चित्रीकरणही झालं होत. परंतु नंतर ऐश्वर्या गरोदर राहिल्यामुळे तिने हा चित्रपट सोडला आणि यावरून मधुर भांडारकर आणि ऐश्वर्यामध्ये मोठा वाद झाला.
ढवळून निघालं बॉलिवूड
ऐश्वर्याने चित्रपट सोडल्यामुळे नाराज झालेल्या मधुर भांडारकर यांनी ऐश्वर्याने गरोदर असण्याची बातमी लपविल्याचा आरोप केला. यानंतर बराच वाद झाला. मीडियामधली भांडारकर यांची उलटसुलट स्टेटमेंट वाचून आपल्या सुनेच्या समर्थनार्थ अमिताभ बच्चन पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, “ऐश्वर्या विवाहित आहे हे मधुर भांडारकर यांना आधीच माहिती होतं. त्यामुळे एका विवाहित स्त्रीच्या गरोदरपणावरून कोणी टिपणी कशी करू शकतं? बऱ्याच वाद विवादानंतर भांडारकर यांनी करीनाला घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि या वादावर पडदा पडला.
चित्रपट मनीषा कोईरालाच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा
हा चित्रपट अभिनेत्री मनीषा कोईरालाच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. परंतु नंतर मधुर भांडारकर यांनी याबद्दल खुलासा केला आणि हा चित्रपट मनीषा कोईरालाच्या आयुष्यावर आधारित नसल्याचं स्पष्ट केलं.
करिनाने वापरले १३० पेक्षा जास्त ड्रेसेस
या चित्रपटामध्ये करिना कपूरने जगभरातील टॉप फॅशन डिझायनर्सनी डिझाईन केलेले 130 हून अधिक वेगवेगळे ड्रेसेस परिधान केले होते. (Lesser Known Facts about Heroine)
वीरेंद्र सेहवागने दिलं होतं ट्रेनिंग
या चित्रपटात रणदीप हुडाने क्रिकेटरची भूमिका केली होती. त्याच्या भूमिकेसाठी त्याला सर्वांच्या लाडक्या वीरू पाजीने क्रिकेटचं ट्रेनिंग दिलं होतं
व्हायरल व्हिडीओ
चित्रपटात ‘माही’चा एक व्हिडिओ व्हायरल झालेला दाखवण्यात आला आहे. करीनाच्या आयुष्यातही तिची आणि शाहिद कपूरची एक क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत होते.
चित्रपटातलं दृश्य आणि सत्यघटना
माही अरोरा एका पार्टीत अर्जुन रामपालच्या माजी पत्नीवर वाईन ओतते ते दृश्य वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिने एका पार्टीमध्ये तिचे पती अनिल थडानी यांची माजी पत्नी नताशा सिप्पी यांच्या अंगावर वाईन फेकली होती. (Lesser Known Facts about Heroine)
=========
हे देखील वाचा – वेबसिरीजला LGBT बोल्ड सीन्सचा तडका खरंच आवश्यक आहे का?
=========
हा चित्रपट नेटफ्लिक्स, अमेझॉवेबसिरीजला LGBT बोल्ड सीन्सचा तडका खरंच आवश्यक आहे का?न प्राईमसह यु ट्यूबवरही उपलब्ध असल्यामुळे अगदी फ्री मध्ये बघता येईल. IMDB वर या चित्रपटाला ५ रेटिंग देण्यात आलं आहे.