‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
लक्ष्मण रेषेचा अर्थ सांगणारा ‘गुमराह’ आणि सत्यघटनेवर आधारित ‘वक्त’
गुमराह (१९६३)
निर्देशक – बी. आर. चोप्रा
गीतकार – साहिर लुधियानवी
संगीत – रवी
कलाकार – अशोक कुमार, माला सिन्हा, सुनील दत्त, शशिकला, निरुपा रॉय व नाना पळशीकर (Gumrah Waqt)
गुमराहच्यावेळी चोप्रांच्या प्रतिभाशक्तीचा एक वेगळाच पैलू पाहण्यास मिळाला. गुमराहची कथा त्यांचीच होती. त्यासाठी रामायणातील एका दाखल्याचा त्यांनी सुरेख उपयोग केला होता. त्यांच्या दृष्टीने गुमराह म्हणजे काय, ते ऐकण्यासारखे आहे. सोनेरी हरीण (मृग) ही एक भ्रामक प्रतिमा आहे हे माहित असूनही प्रभू रामचंद्र सीता माईच्या हट्टांसाठी त्या सोनेरी हरिणाच्या मागावर निबीड अरण्यात गेले. मदतीची याचना करणाऱ्या अयोध्या प्रभू रामचंद्रांच्या नाहीत हे जाणूनही केवळ सीतेच्या आग्रहास्तव लक्ष्मणाने मोठ्या भावाच्या मदतीसाठी जंगलात धाव घेतली, पण काही क्षणात लक्ष्मण परत आला. लक्ष्मणाने आपल्या मंतरलेल्या बाणाने सीता राहत असलेल्या झोपडीच्या सभोवती एक रेषा (लकिर) काढली. (Gumrah Waqt)
सीतेने लक्ष्मणाला विचारले, ‘ही कसली रेषा आहे?’ लक्ष्मणाने तिला अत्यंत मार्मिक उत्तर दिले, ते चोप्रांच्या शब्दांत ऐकण्यासारखे आहे. ‘यह लकिर नही, गृहस्थी की सीमा है. औरत का सुहाग, उसकी आबरू उसका सामराज सब इस लकिर के अंदर सुरक्षित है. माता, कभी इस लकिर के बाहेर न जाना – इसी तरह कि एक लकिर कि कहानी है, जिसका नाम है ‘गुमराह’.
मीनाचे (माला सिन्हा) राजिंदरवर (सुनिल दत्त) प्रेम असते. परंतु प्रतिकूल परिस्थिती, अनपेक्षितपणे मीनाला आपल्या विधुर मेव्हण्याशी विवाह करावा लागतो. ती आपल्या पूर्वीच्या प्रियकराला विसरू शकत नाही. त्याच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवते. यावरून खलनायिका शशिकला तिला ‘ब्लॅकमेल’ करीत असते. त्यातून रहस्यमय गुंतागुंत वाढत जाते. शेवटी ती कुणाच्या इशाऱ्यावरून ब्लॅकमेल करीत असते ते स्पष्ट होते. (Gumrah Waqt)
वक्त (१९६५)
निर्देशक – यश चोप्रा
संगीत – रवी
गीतकार- साहिर लुधियानवी
कलाकार – सुनील दत्त, साधना, राजकुमार, शर्मिला टागोर, शशि कपूर, अचल सचदेव, बलराज साहनी, जीवन, रेहमान, शशिकला, मोतीलाल
काळाचा अगाध महिमा दर्शविणाऱ्या वक्तची कथा एफ.ए. मिर्जानी लिहिली होती. माणूस स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार असतो. स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्या मुलांबाळांचे नशीबही घडवू पहातो. पण काहीवेळा दैव त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असते, क्षणार्धात त्याला उध्वस्त करून टाकते आणि ही वेळ कधी सांगून येत नसते. (Gumrah Waqt)
मिर्जाचे फाळणी पूर्वीचे आयुष्य पाकिस्तानच्या सरहद्दीवरच्या क्वेट्टा शहरात गेले होते. त्याठिकाणी स्वातंत्रपूर्व काळात केदारनाथ अँड सन्स नावाची कारपेट तयार करणारी मोठी फर्म होती. क्वेट्टाच्या भूकंपाच्या भीषण तडाख्यात इतर अनेक कुटुंबांसारखी यांचीही पूर्ण वाताहत झाली होती. पुढे अनेक वर्षांनी, योगायोगाने या कुटूंबातील सदस्य परत एकत्र आले होते. या सत्य घटनेवरच ‘वक्त’ च्या कथेची त्यांनी उभारणी केली होती. (Gumrah Waqt)
=========
हे देखील वाचा – संगीतप्रधान चित्रपटांच्या दुनियेतील गीत विरहित ‘कानून’ तर फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित धर्मपुत्र
=========
चोप्रांच्या बालपणीची लाहोरला गेले असल्यामुळे त्यांना या कथाविषयात विलक्षण रुची निर्माण झाली. ‘वक्त’ च्या कथेवर बीग मल्टिकास्ट घेऊन भव्यदिव्य अशा रंगीत चित्रपटाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरविले. ‘वक्त’च्या कथेला त्यांनी कोर्ट रूम नाट्य खुनाचे रहस्य व दैव वादाची जोड दिली. पटकथा व संवाद अमजाद खानचे सासरे अख्तर उल ईमान यांचे होते. वक्त चे संवाद त्या काळात खूप गाजले होते. (Gumrah Waqt)
वक्त – बुकलेट