आवर्जून पाहाव्यात अशा राजकारणावर आधारित टॉप 5 हिंदी वेबसिरीज
सध्याच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालणाऱ्या राजकारणाची ‘ब्रेकिंग न्यूज’ होते. सोशल मीडियामुळे या बातम्या घराघरांत पोचत आहेत. अगदी इतिहासातील पानांपासून आजच्या डिजिटल पोर्टल्सपर्यंत राजकारण हा मुद्दा चर्चिला जातोय. भारतामध्ये तर पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेल्या विविध राज्यांमध्ये चालणारं राजकारण वेगळ्या प्रकारचं असतं. (Web Series on Politics)
राजकारणावर आधारित कित्येक चित्रपटही बनले आहेत, पण चित्रपटांना वेळेचं बंधन असतं. त्यामुळे या विषयावर आधारित चित्रपट बनवताना विषयमांडणीला मर्यादा असतात, परंतु वेबसीरिजना मात्र या मर्यादा नसतात. त्यामुळे राजकारणावर आधारित वेबसिरीज अधिक प्रभावी वाटतात. आजच्या लेखात राजकारणावर आधारित काही वेबसिरीजबद्दल माहिती घेऊया.
१. सिटी ऑफ ड्रीम्स
राजकारणावर आधारित जबरदस्त वेबसिरीज बघायची असेल तर ‘’सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसिरीज आवर्जून बघायला हवी. या सिरीजमध्ये महाराष्ट्रातील राजकारण दाखवण्यात आले आहे. अर्थात सिरीजचे कथानक संपूर्णतः काल्पनिक आहे. या सीरिजचे एकूण दोन सिझन प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही सीझन्स लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.
राजकारणात कोणी कोणाचं नसतं. सगळी नाती खोटी असतात. इथे आई – वडील, भाऊ – बहीण अशी जवळची नातीही क्षणात परकी होतात. सिरीजमध्ये अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, उदय टिकेकर, सचिन पिळगावकर, संदीप कुलकर्णी, एजाज खान मुख्य भूमिकेत आहेत. मराठी कलाकारांचा भरणा असणाऱ्या या वेबसीरिजच्या दोन्ही सीझनचे एकूण २० भाग असून ही सिरीज डिस्ने हॉटस्टारवर उपलब्ध आहे. (Web Series on Politics)
२. क्वीन
भारतीय राजकारणाचा विषय निघाल्यावर त्यामध्ये काही स्त्रियांची नावे चटकन डोळ्यासमोर येतात. यापैकीच एक नाव म्हणजे जयललिता. क्वीन ही वेबसिरीज जयललितांच्या आयुष्यावर आधारित आहे. भारताच्या राजकारणात दक्षिणेतील राजकारण हा एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे दीक्षित राजकारणाची तोंडओळख करून घ्यायची असेल तर, क्वीन ही वेबसिरीज आवर्जून बघा.
सीरिजचं कथानक सत्यघटनेवर आधारित असून या सिरीजचा केवळ एक सिझन प्रदर्शित झाला आहे. सिरीजमध्ये राम्या कृष्णन, अंजना जयप्रकाश, अनिखा सुरेंद्रन, अंजना जयप्रकाश, सरजानो खालिद, गौतम वासुदेव मेनन, तुलसी आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिरीज MX प्लेअरवर उपलब्ध आहे. त्यामुळे एकदम फ्री मध्ये बघता येईल.
३. महारानी
भारताच्या राजकारणात काही राज्यांमधले ‘राजकारण’ भयंकर या प्रकारात मोडते. यापकीच एक म्हणजे बिहारचे राजकारण. महारानी या वेबसिरीजमध्ये ९० च्या दशकातलं बिहारचं राजकारण दाखवण्यात आलं आहे.
ही एक काल्पनिक कथा असून बिहारच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी साधी सरळ गृहिणी पत्नी जिला राजकारणाचा गंधही नसतो. तिच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागतं आणि ती बिहारच्या मुखमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार बनते. सिरीजचे २ सिझन प्रदर्शित झले आहेत. सिरीजमध्ये हुमा कुरेशी, सोहम शहा, अमित सियाल, कानी कुसरुती, इनाममुलहक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सिरीज ‘सोनी Liv’ वर उपलब्ध आहे. (Web Series on Politics)
४. डार्क 7 व्हाइट
डार्क 7 व्हाईट या सिरीजमध्ये राजस्थानी घराण्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. एका तरुण मुख्यमंत्र्यांची शपथविधीच्या दिवशी हत्या केली जाते. ही हत्या कोणी केली, का केली, कशासाठी केली, अशा अनेक प्रश्नांभोवती सिरीज फिरत राहते. यामध्ये देशाच्या राजधानीमधील राजकारण बघायला मिळणार आहे.
सिरीजचा १ सिझन प्रदर्शित झाला असून सिरीजमध्ये सुमीत व्यास, मोनिका चौधरी, तान्या कालरा, रचित बहल, कुंज आनंद, जतीन सरना, निधी सिंग, शेखर चौधरी, संजय बत्रा प्रमुख भूमिकेत असून ही सिरीज ALT बालाजीवर उपलब्ध आहे.
५. तांडव
राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ता. सत्तेची लालसा अनेक गुन्हे करायला लावते. सत्तेपुढे सारं काही झूठ वाटतं. सत्ता मिळविण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. ज्येष्ठ लोक अनुभवाचं कारण देऊन सत्ता सोडण्यास तयार नसतात, तर तरुणांना सत्ता त्यांच्या हट्ट हवी असते. सत्तेची हाव, घराणेशाही,नातीगोती, विश्वास या साऱ्या गोष्टी अनुभवाच्या असतील, तर तांडव ही वेबसिरीज आवर्जून बघायला हवी.
==================
हे ही वाचा: बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?
सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण…
==================
सिरीजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, अनुप सोनी, मोहम्मद झीशान, कृतिका कामरा, गौहर खान आदी कलाकार मुख्य भूमिकेत असून सीरिजच्या दुसऱ्या सीझनवरून वादंग उठल्यामुळे हा सिझन प्रदर्शित झाला नाही. पहिल्या सीझनचे एकूण ९ भाग असून अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे