युट्युबवर उपलब्ध असणारे हिंदी डब सस्पेन्स थ्रिलर दाक्षिणात्य चित्रपट
दाक्षिणात्य चित्रपसृष्टीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. अनेक उत्तोमोत्तम चित्रपट तिथे निर्माण होतात. ‘जय भीम’ सारखे सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट असोत किंवा दृश्यम सारखे सस्पेन्स थ्रिलर, बाहुबली सारखे भव्य दिव्य चित्रपट असोत किंवा केजीएफ सारखे वेगळ्या धाटणीचे; मनोरंजन क्षेत्रात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने निर्विवादपणे आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. संपूर्ण देशभर या चित्रपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. हा वर्ग हिंदी डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट आवर्जून बघत असतो. अशाच काही हिंदीमध्ये डब केलेल्या सस्पेन थ्रिलर दाक्षिणात्य चित्रपटांविषयी जे युट्युबवर अगदी फ्री मध्ये बघता येतील. (South Indian Movies Dubbed in Hindi)
१. 7th डे
अपघातामुळे एकत्र आलेल्या डेव्हिड अब्राहम, शान आणि विनू या तिघांभोवती हा चित्रपट फिरत राहतो. यापैकी एक सस्पेंडेड पोलीस ऑफिसर. हे तिघे एका अपघाताने एकत्र येतात आणि मग एक एक रहस्य समोर येतं. चित्रपटाचा शेवट म्हणजे प्रेक्षकांना एक जबरदस्त धक्का आहे. चित्रपटामध्ये विशेष अशी कोणती आक्षेपार्ह किंवा भीतीदायक दृश्य नाहीत की, कोणतेही सीरिअल किलिंग नाही. तरीही हा चित्रपट प्रचंड उत्कंठावर्षक झाला आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला IMDB वर ६.९ रेटिंग देण्यात आलं आहे.
२. अंजान पॅथिरा
‘अंजान पॅथिरा’ हा चित्रपट सीरिअल किलिंगवर आधारित आहे. मात्र या चित्रपटातला सीरिअल किलर खून करतोय चक्क पोलिसांचे. सहाजिकच यामुळे शहरात दहशदीचे वातावरण निर्माण होतं. अतिशय भयंकर मनोवृत्तीचा हा सीरिअल किलर पोलसांना मारून त्यांचे डोळे आणि हृद्रय काढून त्यांचा मृतदेह सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर आणून टाकत असतो. पोलिसांची सर्व सिस्टीम हॅक करणारा हा खुनी नक्की एखादा माथेफिरू आहे की, यामागे मोठं षडयंत्र आहे, या प्रश्नाने पोलीस हैराण होतात. हा सीरिअल किलर कोण असतो, तो खून का करत असतो? हे सगळं चित्रपटाच्या शेवटचं समजतंच आणि तोपर्यंत प्रेक्षक चित्रपट एक क्षणही नजरेआड करत नाहीत. २०२० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला IMDB वर ७.९ रेटिंग देण्यात आलं आहे. (South Indian Movies Dubbed in Hindi)
३. यु टर्न
‘यु टर्न’ हा सस्पेन्स चित्रपट असला तरी यामध्ये सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यात आलं आहे. एका वर्तमानपत्रात इंटर्न असलेली रचना, शहरातील उड्डाणपुलावर होणाऱ्या अपघातांवर एक लेख लिहीत असते. या फ्लायओव्हरवरून काही वाहनचालक नित्यनेमाने डिव्हायडर म्हणून ठेवण्यात आलेले काँक्रीट ब्लॉक बाजूला करून यू-टर्न घेत असतात आणि ते पुन्हा जागेवर ठेवत नाहीत. यामुळेच अनेक अपघात होत असतात. उड्डाणपुलावर बसलेला एक बेघर माणूस यू-टर्न घेऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांचे वाहन क्रमांक नोंदवून ती यादी रचनाला देत असतो. ट्रॅफिक विभागाशी संपर्क करून या सर्व लोकांना ती भेटणार असते, पण ती जिथे जिथे जाते तिथे प्रत्येकाचा खून झालेला असतो. हे खून कोण करतं, का करतं हे मात्र चित्रपटाच्या शेवटीच कळतं. २०१८ साली आलेल्या या चित्रपटाला IMDB वर ६.९ रेटिंग देण्यात आला आहे.
४. थडाम
आयआयटी मद्रासचा सिव्हिल इंजिनिअर इझिल आणि त्याच्यासारखाच दिसणारा टपोरी चोर काविन या दोघांभोवती या चित्रपटाची कथा फिरत राहते. हे दोघं एकत्र येण्याचं कारण म्हणजे एक खून. या खुनाचा संशय या दोघांवरही असतो. या दोघांचा एकमेकांशी संबंध असतो का? खरा खुनी कोण असतो? त्याने हा खून कशासाठी केलेला असतो? कोणाला अटक होते? असे अनेक प्रश्न चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या मनात येत असतात. पण सत्य मात्र शेवटीच कळतं आणि जेव्हा सत्य कळतं तेव्हा प्रेक्षक म्हणतात, “ओह माय गॉड!” २०१९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला IMDB वर ८.२ रेटिंग देण्यात आलं आहे. (South Indian Movies Dubbed in Hindi)
=================
हे ही वाचा: ‘तो’ चित्रपट सुरेश वाडकर यांच्या आयुष्यामधली खूप मोठी चूक होती
सुरभी भावे – लहान वयातच एकामागून एक संकटे आली, पण मी हार मानली नाही…
===============
५. रत्सासन
‘रत्सासन’ हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाचा नायक अरुण कुमार एक पोलीस इन्स्पेक्टर असतो ज्याचं स्वप्न असतं सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट बनवणं. परंतु कुटुंबाच्या दबावामुळे त्याने पोलिसांची नोकरी स्वीकारलेली असते. चित्रपटात एकामागून एक खुनाच्या घटना घडत जातात. प्रचंड उत्कंठावर्षक अशा या चित्रपटाचा शेवटही तितकाच धक्कादायक आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला IMDB वर ८.३ रेटिंग देण्यात आलं आहे.