दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सामंथा रुथ प्रभूचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शाकुंतलम’चा ट्रेलर रिलीज
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शाकुंतलम’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये शकुंतलाच्या आयुष्यातील संघर्ष सुंदरपणे दाखवण्यात आला आहे. याशिवाय सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या छोट्या, गोड मुलीची मोठ्या पडद्यावर झालेली एन्ट्रीही शाकुंतलमचे प्रमुख वैशिष्ट ठरले आहे. सामंथाचे चाहते तिच्या शाकुंतलमची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे ही आतुरता अधिक वाढली आहे. ट्रेलरच्या शेवटी अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अरहा हिची झलकी चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवणारी आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर तेलुगूसह सर्व भाषांमध्ये रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती खुद्द सामंथाने सोशल मीडियावर दिली आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 3D मध्ये असणारा शाकुंतलम हा आणखी एक भव्यदिव्य दाक्षिणात्य चित्रपट ठरणार आहे.
‘शाकुंतलम’ हा चित्रपट महान कवी कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ या संस्कृत नाटकावर आधारित आहे. तेलुगु व्यतिरिक्त हा हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात सामंथाने साकारलेल्या शकुंतलाच्या जन्मापासून होते. शकुंतलाचा जन्म होताच तिचे पालक तिला सोडून देतात. यानंतर कण्व ऋषी तिची काळजी घेतात. राजा दुष्यंत (देव मोहन) जंगलात एकदा शिकारीला येतो. तिथे त्याची नजर शकुंतलावर पडते आणि राजा तिच्या सौंदर्याने मोहित होतो. या दोघांमध्ये प्रेम फुलते. जंगलात हे दोघेही लग्न करतात….शंकुतलाची ही गोष्ट आपल्या सर्वांना माहित असली तरी, ती पडद्यावर बघतांना मोहीत व्हायला होणार आहे. कारण शाकुंतलाचे सेट हे अतिशय भव्यदिव्य असून त्याची एक छलक ट्रेलरमध्ये बघायला मिळाली आहे. शकुंतलाचा जन्म ते तिचा तिच्या प्रेमासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.
17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या या चित्रपटासाठी सामंथा प्रभूही (Samantha Ruth Prabhu)खुप उत्साहीत आहे. सामंथाने काही दिवसांपूर्वी देव मोहनसोबतच्या तिच्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट यापूर्वी 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु प्रेक्षकांना 3D मध्ये त्याचा आनंद घेता यावा म्हणून चित्रपटाला उशीर झाला. तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार झालेला हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार हा चित्रपट गुणशेखर यांनी दिग्दर्शित केला आहे. यात सामंथासह (Samantha Ruth Prabhu) सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ. एम मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला आणि जिशू सेनगुप्ता यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सर्वांसोबत अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अरहा यातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवत आहे. ती शकुंतलाचा डॅशिंग मुलगा भरतची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अरहाची एकच छलक दिसत आहे. सिंहावर बसलेल्या अरहाला पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. सामंथा लवकरच ‘कुशी’ या तेलुगू चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या तेलगू रोमँटिक चित्रपटात तिच्या सोबत सुपरस्टार विजय देवरकोंडा दिसणार आहे. शिव निर्वाण या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. याशिवाय ‘आराध्या’ हा हिंदी चित्रपटातही सामंथा(Samantha Ruth Prabhu) दिसणार आहे. ‘सिटाडेल’ या हिंदी चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबतही सामंथा असणार आहे. सामंथाच्या यशोदालाही प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळाला. यशोदा सामंथाच्या अभिनयानं गाजला तसाच तिच्या आजारपणामुळेही. सामंथा गेली काही वर्ष मायोसिटिस या आजाराबरोबर संघर्ष करीत आहे. यशोदाच्या चित्रिकरणानंतर ती यासाठी अमेरिकेतही गेली होती. अमेरिकेत उपचार करुन परतलेल्या सामंथानं शाकुंतलमसाठी खूप परिश्रम घेतले. या पौराणिक चित्रपटासाठी कठीण असे वर्कआऊट केले आहे. तिच्या फिटनेस ट्रेनरही याबाबत तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता.
======
हे देखील वाचा : आशा पारेख का आग्रह करत होत्या स्वतःवरच चित्रित झालेलं गाणं डिलीट करण्याचा?
======
शाकुंतलमसाठी सामंथान पौराणिक कथांचा अभ्यासही केल्याची माहिती आहे. एकूण ट्रेलरमधून तर सामंथानं या चित्रपाटातील आपल्या लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा शाकुंतलम बॉक्स ऑफीसवर कुठले रेकॉर्ड तोडतो, याकडे लक्ष लागले आहे.