मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
मल्टी टॅलेंटेड जॅकलीन…
मुळची श्रीलंकेची म्हणून आपण जिला ओळखतो ती जॅकलीन खरं तर, गल्फ कंट्री पैकी एका बहारीन शहरात जन्माला आली. तिचे वडील एलोय फर्नांडीस श्रीलंकेचे, आई किम हि मलेशिअन आणि आजोबा मुळचे कॅनडीयन असल्यामुळे; ती लहानपणा पासूनच बहु-सांस्कृतिक घरात वाढली. तिचे वडील श्रीलंकेत म्युसिक क्षेत्रात कार्यरत होते परंतु १९८० मध्ये, श्रीलंकेत चालू असलेल्या तमिळ विरुद्ध सिंहली या वादाला कंटाळून बहारीन शहरात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला.
११ ऑगस्ट १९८५ला बहारीन शहरात जॅकलीनचा जन्म झाला. पुढे अवघी १४ वर्षाची असताना जॅकलीनने एका टीव्ही शोसाठी होस्ट म्हणून काम केलं. बहारीन येथे तीच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर; ऑस्ट्रेलियामधील सिडनीविद्यापीठातून तिने मास कॉमुनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया मध्ये ती टीव्ही रीपोर्रटर म्हणून काम करत होती, पण लहान वयातच आपल्याला अभिनेत्री होऊन पुढे हॉलीवूडची तारका व्हायची आकांक्षा तिने उराशी बाळगली होती. त्यासाठी तिने अभिनयाचे धडे घ्यायला सुरवात केली. सोबतच स्पॅनिष भाषा आत्मसात करत फ्रेंच आणि अरेबिक सारख्या भाषा पण आत्मसात केल्या. टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत असतानाच मॉडेलिंग इंडस्ट्रीत सुद्धा जॅकलीनला यश मिळत होतं.
पुढे मुळातच सुंदर असलेल्या जॅकलीनने आपल्या सुंदरतेच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर, २००६ साली मिस् युनिवर्स जिंकून घेत आपल्या करिअरची दमदार सुरवात केली. २००९ साली मॉडेलिंग असाइन्मेट साठी जॅकलीन भारतात आली असताना, सुजोय घोष यांच्या ‘अल्लादिन’ या मालिकेसाठी जॅकलीनची निवड झाली आणि भारतीय फिल्म इंडस्ट्रीत जॅकलीनची एन्ट्री झाली. पुढे ‘ जाने कहा से आयी हे ये, हाउसफुल, मर्डर २..’ अशा अनेक चित्रपटातून जॅकलीन आपल्याला भेटत राहिली. पुढे २०१४ मध्ये ‘किक’ चित्रपटाच्या निम्मित्त्याने जॅकलीन पुन्हा चर्चेत आली. या काळात बेस्ट ड्रेसड् अॅक्ट्रेस, मोस्ट डीसायरेबल वूमन हे आणि असे अनेक पुरस्कार जॅकलीनच्या नावावर आहेत.
ग्लॅमर, मिडिया, याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यात मात्र जॅकलीन प्राणीप्रेमी आहे. शिवाय फिटनेस, डायट या सगळ्याची तिला आवड आहे. स्वतः नवीन नवीन डिश बनून बघायला जॅकलीनला खूप आवडतं आणि एवढच नाही तर श्रीलंकेत ‘कायेमा सूत्र’ नावचं एक हॉटेल सुद्धा जॅकलीनने सुरु केलं, तिच्या आज्जीच्या खास काही रेसिपीज या हॉटेल मध्ये खायला मिळतात. प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ दोन्हीचा उत्तम तोल साधत जॅकलीन तीच्या करिअरचा आलेख उंचावत नेते आहे. तिच्या आयुष्यात तिला असेच यश मिळत राहो अशी सदिच्छा.. हॅप्पी बर्थ डे जॅकलीन..!!
-कांचन नानल