Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!

‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बाप्पाच्या मिरवणूकीची धम्माल

 बाप्पाच्या मिरवणूकीची धम्माल
टीव्ही वाले मिक्स मसाला

बाप्पाच्या मिरवणूकीची धम्माल

by गणेश आचवाल 27/08/2020

झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेने अफाट लोकप्रियता मिळवली. त्यातील मुख्य अभिनेता यशोमान आपटे याचा फॅन क्लब प्रचंड वाढला. यशोमानने याआधी संत ज्ञानेश्वर मध्ये ‘सोपानदेव’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘झोपाळा’, ‘बिनधास्त पहा’ या नाटकात देखील त्याच्या भूमिका होत्या. सध्या तो ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत भूमिका करत आहे. तसेच ‘सिंगिंग स्टार’ या रियालिटी शो मध्ये देखील सहभागी झाला आहे. यशोमान गणपतीबद्दलच्या आठवणी सांगताना म्हणतो, “आम्ही पार्ल्याला राहतो.  आमच्या घरी दीड दिवसांसाठी गणपती आणला जातो. नातेवाईक, मित्रमैत्रिणी घरी बाप्पाच्या दर्शनाला येतात. खूप धमाल असते. पण यंदाच्या वर्षी मात्र या कोरोनाच्या सावटामुळे कोणाला घरी बोलावता आलं नाही, याची खंत वाटते. साध्या पद्धतीने गणपती साजरा झाला.

 मी पार्ले टिळक विद्यालयात असताना आमचा चार पाच मित्रांचा ग्रुप होता. आम्ही पार्ल्यातील ‘विलेपार्ल्याचा सम्राट’ या सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीत नाचायचो. खूप मजा यायची. पुढे कॉलेजला गेल्यावर गिरगाव आणि खेतवाडीतले सार्वजनिक गणपती पाहायला जाणे, हे आम्हाला खूप आवडायचे. सकाळीच आम्ही एक दिवस ठरवून गिरगावात जायचो, मग सर्व गणपतींचे दर्शन घेऊन आम्ही खाऊगल्लीत खायला  जायचो. तेथून मरीन ड्राइव्ह च्या कट्ट्यावर अगदी संध्याकाळ पडेपर्यंत गप्पा मारत बसायचो. खूप मजा यायची. आता कितीही इच्छा असली तरी सार्वजनिक मिरवणुकांमध्ये सहभागी होणे शक्य नाही.

मित्रांपैकी बऱ्याच जणांकडे दीड दिवसांचे गणपती येत असल्याने आम्हाला एकमेकांकडे जायला वेळ मिळत नव्हता. पण सार्वजनिक गणपती मात्र आम्ही एकत्र पाहायला जायचो. मालिकांमध्ये सुद्धा हल्ली गणपती बाप्पा आणला जातो. ‘फुलपाखरू’ मालिकेत सुद्धा गणपतीचा सिक्वेन्स होता. तिथेही गणपती उत्सवाचा आनंद घेता आला. यावर्षी या गोष्टींच्या आठवणीत रमून जायला होते.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Entertainment Featured Television Zee Yuva
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.