दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शक्तिमान
‘शक्तिमान’ आला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!!!
पाहूया जुन्या कलाकारांच आताचं रूप…….
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या शो पैकी ‘शक्तीमान’ हा शो पुन्हा एकदा डीडी नॅशनलवर प्रसारित करण्यात आला आहे. सुरवातीला 1997 ते 2005 मध्ये या शोचं प्रसारण झालं होतं. पण आता जवळपास 15 वर्षांनंतर या शोमधील कलाकार ओळखताही येणार नाहीत इतके बदलले आहेत.
आपल्या सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’ म्हणजेच ‘मुकेश खन्ना’ आता फारच बदलले आहेत. त्यावेळी अनेक मालिकांमध्ये काम करून त्यांनी आपले नाव गाजवले होते. शक्तीमानमध्ये ‘गीता विश्वास’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘वैष्णवी महंत’ आता 45 वर्षांची आहे. मात्र आता ती ओळखताही येत नाही एवढी बदलली आहे. शक्तीमानमध्ये शोच्या हिरोसोबत सर्वाधिक मुलांच्या सर्वाधिक लक्षात राहिला तो म्हणजे या शोमधील व्हिलन. शो मधील व्हिलन म्हणजे ‘तमराज किलविश’ अर्थात अभिनेता ‘सुरेंद्र पाल’ आता असे दिसतात.
शक्तीमानमध्ये ‘नौरंगी’ बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारे ‘किशोर आनंद भानुशाली’ आता असे दिसतात. त्यांनी भाभी जी घर पर है या मालिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘मेयर जेजे’च्या भूमिकेत अभिनेता ‘नवाब शाह’नं मुलांना खूप घाबरवलं होतं. आज नवाब शाह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘काळी मांजर’ आणि ‘शलाका’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘अश्विनी कळसेकर’ त्यावेळी तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी ठरली होती. गोलमाल सिनेमातदेखील त्यांनी आपल्या अभिनयाची चांगलीच छाप सोडली. लवकरच शक्तीमानचा सिक्वेल तयार करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाउननंतर यावर काम सुरू होऊ शकतं. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन करण्यात आलं आणि त्यामुळेच रामायण, महाभारत या लोकप्रिय शोसोबतच आता शक्तीमान हा लोकप्रिय शोसुद्धा टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आला आहे.
कलाकृती टीम
फोटो सौजन्य- गुगल आणि कलाकारांच सोशल मिडिया