‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
खऱ्या स्पायडरमॅनची रोमहर्षक लाईफ स्टोरी
स्पायडरमॅन… भींतीवर कुठल्याही आधाराशिवाय चढणारा. थेट आकाशात उडणारा. संकटात मदत करणारा. हा स्पायडरमॅनम्हणजे लहान मुलांचा जीव की प्राण. पण त्याचे अॅक्शन एवढे भारी की समस्त तरुणाईही त्याच्या प्रेमात. त्यामुळेच स्पायडरमॅनवर आधारीत चित्रपट आला आणि जगभर ब्लॉकबस्टर ठरला. 820 मिलीयन डॉलरची कमाई या चित्रपटानं करुन दिली. मार्वल स्टुडीओच्या चित्रपटाला यशाची आणखी एक मालिका सापडली आणि एका तरुणालाही लोकप्रियता मिळाली. त्याला स्पायडरमॅन पिटर पार्कर ही नवी ओळख मिळाली. हा तरुण म्हणजे टोबी मैग्वायर. मार्वलच्या स्पायडरमॅनचा चेहरा म्हणून टोबीची ओळख झाली. या चित्रपटाच्या तीन सिक्वलमध्ये त्यानं स्पायडरमॅनची भूमिका केली. बालकलाकार म्हणून हॉलिवडूमध्ये दाखल झालेला टोबी आता पंचेचाळीस वर्षाचा होतोय. टोबीचा सगळा प्रवास म्हणजे एक संघर्ष आहे. एकेकाळी तो दारुच्या आहारी गेलेला होता. आतामात्र तो कुठलंही व्यसन करत नाही. फारकाय तो पूर्णपणे शाकाहारी आहे.
टोबीचा जन्म अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रातांत 27 जून रोजी झाला. त्याची आई लेखिका तर वडील कूक होते. त्यामुळे टोबीलाही आपण कुकींग व्यवसायात करीअर करावं असं वाटायचं. मुळ टोबीचं सगळं लहानपण एका भागातून दुस-या भागात आई वडीलांच्या मागे फिरण्यात गेलं. त्याच्या आईनं त्याला अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायला प्रोत्साहन दिलं. या अभिनयातून त्याला नवा मार्ग सापडला. मग त्यानं चक्क शाळेला रामराम ठोकून अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. त्याला बालकलाकार म्हणून भूमिका मिळाल्या. विझार्ड हा त्याचा पहिला चित्रपट. यात टोबीच्या वाट्याला एकही डायलॉग आला नाही. पुढे टोबी विसाव्या वर्षापर्यंत चित्रपट आणि जाहीराती मध्ये झळकत होता. पण त्याला टोबी अशी स्वतंत्र ओळख मात्र मिळवता आली नाही. छोट्या पडद्यावरही त्याची मालिका आली. पण त्यातही टोबीला फारसं यश आलं नाही. दरम्यान टोबीची जीवनशैली बदलली. तो दारुच्या आहारी गेला. काही चित्रपटांमधून त्याला काढण्यात आलं. टोबी थेट व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. या केंद्रातू बाहेर पडल्यावर मात्र टोबीत सुधारणा झाली आणि आपल्या करिअरबाबत तो गंभीर झाला. त्याला आईस स्टॉर्म, प्लिसेंटविली, दि सिडर हाऊस रुल्स सारख्या चित्रपटात भूमिका मिळाली. पण टोबीचं नाव झालं ते मार्वल स्टुडीओच्या स्पायडरमॅनमुळे.
आपल्या वयोवृद्ध नातेवाईकांसोबत पिटर रहात असतो. अंकल बेन आणि आन्ट मे. या त्याच्या अंकलना एक भूरटा चोर मारतो. आणि वृत्तपत्रात फोटोग्राफर म्हणून काम करणारा पिटर पार्करला अशा काही जादुई शक्ती मिळतात की तो सुपरहिरो होतो. स्पायडरमॅन. कोळ्यासारखा त्याचा ड्रेस. लाल आणि निळ्या रंगातला. चेहरा झाकलेला. तो कसाही, कुठेही चढू शकत होता. आकाशाचा झोपाळा म्हणून वापर करु शकत होता. हा स्पायडरमॅन सर्वांना मदत करत होता. तो लहान मुलांचा फेव्हरिट हिरो झाला. तसाच तरुणांचा आणि वयोवृद्धांचाही.
पिटर पार्कर अर्थात स्पायडरमॅन ही टोबी मैग्वायरची ओळख झाली. या चित्रपटाचे तुफान यश बघून टोबीला त्याच्या पुढच्या दोन भागातही स्पायडरमॅनची भूमिका मिळाली. पहिल्या स्पायडरमॅन चित्रपटाला 820 मिलीयन डॉलर, दुस-या स्पायडरमॅन चित्रपटाला 700 मिलीयन डॉलर तर तिस-या स्पायडरमॅन चित्रपटाला 890 मिलीयन डॉलर एवढा फायदा झाल्याची चर्चा होती. पुढे या स्पायडरमॅनवर व्हिडीओ गेमही आला. त्यातील स्पायडरमॅनलाही टोबीनं आवाज दिला. एकूण स्पायडरमॅन म्हणून टोबी ओळखला जाऊ लागला.
त्यानंतर मात्र मार्वलनं टोबीला स्पायडरमॅनम्हणून डच्चू दिला. आणि टोबी या सुपरहिरोपासून दूर झाला. त्यानं वंडर बॉईज, सिबिस्कुट, ट्रॉपिक थंडर, ब्रदर्स सारख्या चित्रपटात काम केलं. जेनिफर मेअर या अभिनेत्रीबरोबर लग्न केलेल्या टोबीला रुबी आणि ओटीस अशी मुलं आहेत.
स्पायडरमॅन चित्रपटाचे पुढचेही भाग येत आहेत. पण त्यात टोबी नसणार. त्याचा गोड चेहरा. त्यावरचं हसू आणि निरागस भाव. हे सर्व टोबीच्या यशाचं श्रेय आहे. स्पायडरमॅन म्हणून व्हिलनला मारतांना तो कितीही आक्राळविक्राळ झाला तरी त्याच्या चाहत्यांना त्याच्या चेह-यावरचं खट्टाळ हसूचं अधिक भावतं. त्यामुळेच आता कितीही स्पायडरमॅन आले तरी त्याचा चेहरा म्हणून टोबीची ओळख कायम झाली आहे. ती कायम रहाणार हे नक्की.