‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अभिनयसंपन्न मनोज जोशींचा आज वाढदिवस
तुम्हाला “राऊ” मालिकेतला ‘बाजिराव’ किंवा ‘फिर हेरा फेरी’ सिनेमातील ‘कचराशेठ’ आठवतोय का? तुमचा आताचा बाजीराव रणबीर सिंग असला तरी तुमच्या आई- वडिलांच्या काळातला बाजिराव म्हणजे अभिनेते मनोज जोशी.
कोकणातील लाल मातीत वाढलेले मनोज जोशींचा आज वाढदिवस. 3 सप्टेंबर १९६५. किर्तनकाराच्या कुटुंबात जन्माला आलेले मनोज जोशी मूळ गुजरातचे. त्यांचं बालपण, शिक्षण महाराष्ट्रात गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मसाला व्यापाराकरता काही कुटुंब गुजरातहून महाराष्ट्रात आणले. त्यापैकीच मनोज जोशी यांचं कुटुंब. त्यामुळे त्यांचं शिक्षण मराठीत झालं.
मराठी, हिंदी, गुजराती भाषिक नाटकं, सिनेमा, मालिकांमध्ये अष्टपैलू अभिनेते मनोज जोशी यांनी आपला ठसा उमटवला. ख्यातनम कीर्तनकाराच्या कुटुंबात वाढल्यानं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी किनार आहे. बोलण्यातला ढंग, कामातला पर्फेक्टनेस, आवाजातील चढ-उतार आदी गोष्टींची शिकवण त्यांना कुटुंबातूनच मिळाली.
‘कलापी’, ‘गांधी विरुद्ध गांधी’, ‘डॉक्टर तुम्ही पण’, ‘मन मिले त्या मेलो’, ‘रंगीलो’, ‘सूर्यवंशी’ इ. मराठी आणि गुजराती नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. त्याचबरोबर ‘सरफरोश’, ‘देवदास’, ‘हंगामा’, ‘फिर हेरा फेरी’, ‘धूम’, ‘पेज ३’, ‘चूप चूप के’, ‘गुरू’, ‘विवाह’, ‘नारबाची वाडी’, ‘भारतीय’ अशा अनेक हिंदी, मराठी, गुजराती भाषिक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
अभिनेते मनोज जोशी आपल्या अभिनयाच्या अदाकरीनं चाहत्यांना मोहित करतात. आजही बाजीराव म्हटलं लोकांना मनोज जोशींचा चेहरा समोर आल्याशिवाय राहत नाही. अभिनेत्री अश्विनी भावेसोबत केलेली ‘राऊ’ ही मनोश जोशींची पहिलीच मराठी मालिका. पण याआधीपासून ते मराठी आणि गुजराती भाषिका नाटकांमध्ये बरीच वर्ष काम करत होत. दूरचित्रवाणीच्या २०१५ ची ‘चक्रवती सम्राट अशोक’ या मालिकेतील अभिनेते मनोज जोशींची ‘चाणक्य’ची भूमिका विशेष गाजली.
‘कहता है दिल’ या चित्रपटातील नेगेटिव्ह भूमिकेसाठी Indian Telly Best Actor Award (२००३), २०१८ साली पद्मश्री तसेच २०१६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे.
कलाकृती मिडीयाकडून अभिनेते मनोज जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !