‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शिवकालीन अंगाई ‘क्षणपतूर’ प्रेक्षकांच्या भेटीला
‘निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।’
असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणाऱ्या सर्व मातांची. आपला मुलावर केवळ आपला नसून तर त्याच्यावर पहिला स्वराज्याचा अधिकार आहे. याच प्रेरणेतून सर्व मातांनी पोटच्या मुलाला स्वराज्य चरणी अपर्ण केलं. मुलाच्या आयुष्या आईचं स्थान हे तलवारीच्या मागच्या मुठीसारखं असतं. मुठ जितकी घट्ट, तितकी लढाई दमदार!
अनघा काकडे दिग्दर्शित आणि Do Re-Do निर्मित ‘क्षणपतूर’ अंगाईमध्ये अशाच एका माऊलीची कथा यातून मांडली आहे. स्वराज्य स्थापनेसाठी वेडावलेला इवलासा जीव आणि त्याची काहीशी हळवी, कणखर, पोलादाचं काळीज असलेली आई अन् तीच्या मनाची घालमेल यातून मांडण्याचा प्रयत्न केलाय.
या शिवकालीन अंगाईत स्वराज्याच्या लढाईसाठी मुलाला तयार करणाऱ्या आईचे कणखर रूप अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ तर मुलाची भूमिका ‘हरक भारतीया’ याने साकारली आहे. या शिवकालीन अंगाईचे गीत लेखन ‘अनघा काकडे’ तर ‘नुपूरा निफाडकर’ने संगीतबद्ध केले असून तिनेच त्याचे पार्श्वगायनही केले आहे. ‘राजश्री मराठी’ या युट्युब चॅनलवर ही शिवकालीन अंगाई प्रसिध्द करण्यात आली आहे. अप्रतिम अशी शिवकालीन अंगाईची कलाकृती रसिकांना खूप भावली आहे. अंगाई ऐकताना अंगावार काटा आल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो आणि डोळे पाणवतात.
स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या ममतेचा त्याग केलेल्या सर्व माऊलींना ‘क्षणपतूर’ अंगाई समर्पित करण्यात आली आहे.