“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचं निधन
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन झालं आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यानं 35 व्या वर्षी त्याचं निधन झाल्याचं कळतंय.
गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. म्युझिक अरेंजर, निर्माता म्हणून आदित्यनं काम केलं आहे. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. करोनाचा प्रादुर्भाव असल्याने नियमांचं पालन करत मुंबईत आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘साहेब तू’ या गाण्याचा प्रोड्युसर म्हणूनही आदित्यने काम केलंय.
अनुराधा पौडवाल यांचे पती अरुणसुद्धा संगीतकार होते. नव्वदच्या दशकात अनुराधा पौडवाल करिअरच्या शिखरावर होत्या. त्यावेळी त्यांचे पती अरुण यांचं निधन झालं.