Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बनवाबनवीच्या कमळीने मिळवले हजार रुपये

 बनवाबनवीच्या कमळीने मिळवले हजार रुपये
आईच्या गावात

बनवाबनवीच्या कमळीने मिळवले हजार रुपये

by Kalakruti Bureau 23/09/2020

अशी ही बनवाबनवी सिनेमानं हैदोस घातला महाराष्ट्रात. हा सिनेमा आला होता तेव्हा साल होतं १९८८. म्हणजे जवळपास बत्तीस वर्षं झाली तरी या सिनेमाची जादू काही ओसरायचं नाव घेईना. निर्माते किरण शांताराम यांनी अशी ही बनवाबनवी बनवण्यासाठी त्याची सगळी धुरा दिली ती सचिन पिळगांवकरांवर. सचिन यांनी ही जबाबदारी लीलया उचलली. केवळ दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर अभिनेता, गायक आणि सुधा म्हणून सुद्धा. 


जवळपास ३३ वर्षं होऊनही या सिनेमाची जादू.. त्यातल्या व्यक्तिरेखा आजही ताज्या आहेत. धनंजय, सुधीर, कमळी, परश्या, शंतनू, मनीषा, माधुरी या व्यक्तीरेखा अजरामर झाल्या आणि त्यातही लक्षात राहिले ते सरपोतदार. अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगांवकर, विजू खोटे, सुधीर जोशी, निवेदिता सराफ, सिद्धार्थ रे यांनी धमाल आणली. या सिनेमाबद्दल जेवढं बोललं जाईल तेवढं कमी आहे. ‘धनंजय माने इथेच राहतात का’, ‘सत्तर रुपये वारले’, ‘लिंबू कलरची साडी’, ‘इस्त्रायलमधून आलेला मित्र’, ‘हा माझा बायको’ अशा प्रत्येक संवादांसह ‘ही दुनिया माया जाल’, ‘कुणीतरी येणारं येणारं गं’, ‘ह्रदयी वसंत फुलताना’ अशी एकापेक्षा एक गाणी या सिनेमान दिली. 


पण आज एक अशी गंमत आपण सांगणार आहोत जी फार कुणाला माहीत नाही. यातल्या जोड्या पुष्कळ गाजल्या. शंतनु-सुषमा, धनंजय-माधुरी, परश्या-कमळी, सुधीर-मनीषा अशा. यातल्या अनेकांबद्दल यापूर्वी अनेक ठिकाणी आलं आहे. आता आपण जे सांगणार आहोत ती गोष्ट आहे कमळीची. कमळीची व्यक्तिरेखा साकारली आहे प्रिया बेर्डे यांनी. खरंतर प्रिया यांचा बनवा बनवी हा पहिला चित्रपट. हा चित्रपट त्यांनी स्विकारल्या तेव्हा त्या होत्या अवघ्या १६ वर्षाच्या. आणि हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा त्या होत्या १८ वर्षाच्या. हा त्यांचा पहिला चित्रपट. या सिनेमासाठी त्यांना मानधन मिळालं होतं ते अवघं अडीच हजार रुपये. त्यावेळी ही रक्कमही तशी थोडी नव्हती. पण इतर कलाकारांच्या मानाने ही रक्कम कमी होती. प्रिया यांचाही पहिलाच सिनेमा असल्यानं हा त्यांच्यासाठी मोठा  ब्रेक होता. सोबत अशोक सराफ, लक्ष्मीकांत  बेर्डे, अश्विनी भावे, सचिन अशी मंडळी होती. त्यामुळे हा सिनेमा मोठा होता. पदार्पणातच हा सिनेमा आल्यानं त्यांनी तो स्वीकारला. मानधन घेऊन कामही सुरू केलं. पण खरी गंमत घडली ती ह्रदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.. या गाण्यावेळी. 


या गाण्याचं चित्रिकरण सुरू झालं. या सिनेमातली प्रत्येक जोडी नाचत होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतीला होत्या प्रिया बेर्डे. म्हणजे तेव्हाच्या प्रिया अरूण. गाण्याचं शूट सुरू झालं. एरवी गाण्याचं शूट करणं फार त्रासदायक. एक स्टेप चुकली की पुन्हा रीटेक आला. पण प्रिया या मुळात नृत्यांगना होत्या. त्यांनी या गाण्यात दिलेल्या स्टेप्स बरहुकूम केल्या. यात वेळ वाचलाच, शिवाय निर्माते किरण शांतारामही खुश झाले. प्रिया यांचं नृत्यकौशल्य पाहून लगेच हजार रुपये प्रिया यांना वाढवून दिले. असं सर्वसाधारणपणे कधी होत नाही. पण काम पाहून दिलेली ती दाद होती. 

अशी ही बनवा बनवी हा उत्तम टीमवर्कचा परिणाम होता. लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय, संवाद, संकलन, वेशभूषा-रंगभूषा या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट अस्सल होता. यामुळेच गेल्या तीस वर्षांपासून अधिराज्य गाजवतो आहे.

  • धनंजय माने  
  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment Featured Marathi Movie Marathi songs
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.