मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
किसी शायर की गझल… ड्रीम गर्ल
हिंदी सिनेमा नायिकांच्या बाबतीत दाक्षिणात्य आणि वंग अभिनेत्रींवर कायमच निर्भर राहिलेला दिसतो. दक्षिणेकडच्या नायिकांचा बोलबाला अगदी बोलपट सुरु झाला तेंव्हा पासून होता. नायक उत्तरेकडचा आणि नायिका दक्षिणेकडील किंवा बंगाली हा ट्रेंड परफेक्ट होता. दक्षिणेतील नायिकांचा हिंदी सिनेमात वावर पन्नासच्या दशकापास्न जास्त वाढला.
वैजयंतीमाला, वहिदा रहमान, बी.सरोजादेवी, अंजली यांनी साठच्या दशकापर्यंत आपला जलवा कायम ठेवला. या दशकाच्या अखेरीस एक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर झळकली आणि पाहता पहाता तिने आख्या बॉलीवूडला वेड लावलं. अभिनयासोबतच किंबहुना त्यापेक्षाही अधिक लक्ष तिने तिच्या आवडीच्या नृत्य कले कडे दिल. आज वयाच्या साठीतही ‘ग्रेसफुल’ दिसणारी हि अभिनेत्री म्हणजे ‘हेमा मालिनी’.
१९६८ साली ‘शोमन’ राजकपूर सोबत ती पहिल्यांदा प्रेक्षकांपुढे आली. चित्रपट होता ‘सपनोका सौदागर’. सिनेमा चालला नाही पण हेमाचं सर्वत्र कौतुक झालं. या सिनेमाच्या प्रसिद्धी करिता तिचा उल्लेख ‘ड्रीम गर्ल’ म्हणून करण्यात आला. आणि योगायोगाने याच नावाने ती पुढे प्रसिध्द झाली, याच नावाचा तिचा सिनेमा १९७७ ला झळकला. हेमाचा जन्म १५ ऑक्टोबर १९५० चा नवरात्रातील अखेरच्या दिवशी दसऱ्याच्या मध्यरात्री एका दक्षिणात्य ब्राह्मण कुटुंबात झाला. घरात अत्यंत धार्मिक वातावरण. दोन भावांच्या पाठीवर झालेलं हे तिसर अपत्य.
या लावण्यसंपन्न मुलीचे नाव आई जया चक्रवर्तीनी ठेवलं ‘हेमा मालिनी’ या नावाचा अर्थ ‘दिव्य सौंदर्य’. लहानग्या हेमाचे बालपण पुढे दिल्लीत गेले.इथेच तिच्या ‘भरत नाट्यम’चा ओनामा झाला. अंगभूत कलागुण असल्याने लवकरच ती नृत्यात तरबेज झाली. हेमाचे वैशिष्ट्य असे की स्वतंत्र भारतातील सर्व राष्ट्रपतींसमोर तिला आपला नृत्याविष्कार सदर करण्याची संधी मिळाली. १९६५ साली एका तमिळ चित्रपटासाठी तिची निवड झाली.
(तिच्या सोबत या सिनेमात सह अभिनेत्री म्हणून जयललिता होती.) वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मिळालेली संधी अनपेक्षितपणे हिरावली गेली. काहीही कारण न देता निर्मात्याने हेमाला चित्रपटातून काढून टाकले. कोवळ्या वयात तिच्या मनावर हा मोठा आघात होता. यातून तिने आणि तिच्या कुटुंबियांनी धडा घेतला व ते जाणीवपूर्वक व्यावसायिक बनले. (गंमत म्हणजे याच तमिळ चित्रपटाच्या दिग्दर्शका कडे तिने १९७४ साली ‘गहरी चाल’ हा सिनेमा केला.)
अनंतस्वामी या त्यांच्या कौटुंबिक मित्राकडून हेमाकरिता बॉलीवूड चे दर उघडले आणि तिला पहिला चित्रपट चक्क राजकपूर सोबत मिळाला, आणि हिंदी सिनेमाचा पडदाच तिच्या प्रेमात पडला. देव आनंद सोबतच ‘जॉनी मेरा नाम’ (१९७०) तिचा पहिला सुपर हिट सिनेमा ठरला.