Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

भावाच्या पावलावर पाऊल टाकत जेव्हा ‘तो’ झाला कलाकार

 भावाच्या पावलावर पाऊल टाकत जेव्हा ‘तो’ झाला कलाकार
नाट्यकला मिक्स मसाला

भावाच्या पावलावर पाऊल टाकत जेव्हा ‘तो’ झाला कलाकार

by रश्मी वारंग 28/10/2020

आपल्या समोर वावरणाऱ्या कलाकारांकडे पाहून आपल्याला अभिनय करावासा वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे पण ध्यानीमनी नसताना जेव्हा आपल्याच भावाची भूमिका आपल्या वाट्याला येते तेव्हा?

असा झकास योग ज्याच्याबाबतीत जुळून आला; तो कलाकार आहे उमेश कामत.

उमेश कामतच्या कुटुंबाचा अभिनयाशी तसा अजिबात संबंध नव्हता,‌ पण आई-वडिलांना नाटकाची आवड होती. उमेशच्या दूरच्या कुणी नातेवाईकांनी वर्तमानपत्रात बालकलाकारासाठी आलेली जाहिरात उमेशच्या आई-वडिलांना दाखवली. उमेशच्या मोठ्या भावाला अर्थात जयेश कामतला घेऊन त्यांचे आई-बाबा ऑडिशनला गेले.

६० मुलांमधून अंतीम ३ मुलांमध्येजयेशची निवड झाली. त्या तीन मुलांपैकी दोघांबाबत नाटकांचे निर्माते मोहन वाघ आणि दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्यात वेगवेगळी मतं होती. त्यावर उपाय म्हणून तीन जणांना ५-५ प्रयोग करू द्यावे आणि त्यातून अंतीम बालकलाकार ठरवावा असे ठरले. पण पहिल्या प्रयोगात जयेश याने अशी छाप पाडली की त्यालाच बालकलाकार म्हणून निश्चित करण्यात आले. नाटक होतं सोनचाफा. आणि सोबत होते दिग्गज कलावंत यशवंत दत्त आणि वंदना गुप्ते.

हे वाचलेत का ? नवा गडी अन् राज्य नवं…

नाटकाचे साधारण २५० प्रयोग झाल्यावर जयेशची उंची वाढली जी भूमिकेसाठी उपयुक्त नव्हती. मोहन वाघ तेव्हा नव्या मुलाच्या शोधात होते. आपल्या भावाचे नाटक पहायला गेलेला उमेश तिथे विंगेत, स्टेजसमोर तेंव्हा बागडत असे. एके दिवशी मोहन वाघ यांनी ते पाहून उमेशला विचारलं,‌ काय रे नाटकात काम करशील का? इयत्ता पाचवीत असणा-या उमेशला नाटक म्हणजे काय ते ही समजही नव्हतं.

पण उमेश ने खणखणीत ‘हो’ असं उत्तर दिलं.

अशाप्रकारे सोनचाफा नाटकातून उमेशचं नाटकात पदार्पण झाले. अगदी कमी कालावधीत दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांनी उमेशकडून  तालीम करुन घेतली. पण संपूर्ण नटसंचासोबत तालीम झाली नव्हती, त्यामुळे उमेशच्या पहिल्या प्रयोगाला सगळेच चिंतेत होते. सारेजण विंगेत उभं राहून नाटक पहात होते. पण नाटक सुरू झाल्यावर उमेश सहतजेने स्टेजवर वावरला आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

हेही वाचा : डॉ. रामाणींचा ताठ कणा

तेव्हापासून आतापर्यंत स्वामी, रणांगण, मन उधाण वाऱ्याचे, गांधी आडवा येतो, डोन्ट वरी बी हॅप्पी, दादा एक गुड न्यूज आहे, अशा विविध नाटकातून उमेशचा अभिनय पाहायला मिळतो. पण कोणताही विचार नसताना अगदी अचानक उमेशकडे आलेली त्याच्याच भावाची भूमिका त्याला कलाकार करुन गेली.

उमेशचा हॉट लूक

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor child actor Entertainment Theatre
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.