‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
एक हि रास्ता (१९५६)
एक ही रास्ता
निर्देशक – बी. आर. चोप्रा.
संगीत- हेमंतकुमार.
गीतकार- मजरूह सुलतानपुरी.
कलाकार – अशोक कुमार, मीना कुमारी, सुनीलदत्त, जीवन, डेझी इराणी,
पाहुणे कलाकार- कुमकुम, बेबी नाज
समाजाचा उत्कर्ष साधायचा असेल तर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन समाज प्रबोधन करण्यासाठी हाच सामजिक विषय निवडून पंडित मुखराम शर्मा यांच्या कथेवर चोप्रांनी एक हि रास्ता या बी. आर. च्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली.
हे वाचलंत का: चांदनी चौक १९५४ – ‘चांदनी चौक’ हा चोप्रांनी निर्देशित केलेला पहिला मुस्लिम सोशल चित्रपट होता.
सर्वसाधारण तरुणी सारखा भावी संसाराची सुखद स्वप्ने रंगवत मालतीचा (मीनाकुमारी) जीवनक्रम चालू होता. मालतीला स्वप्नातला राजकुमार (सुनीलदत्त) भेटला. तेव्हा ती अभिसारिका प्रेमाच्या सुखद अनुभूतीने नाहून निघाली. मालतीच्या प्रीतीला पालवी फुटली, तिने राज सारखा (डेझी इराणी) गोंडस पुत्राला जन्म दिला तेव्हा तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अचानक तिच्या वर वैधत्वाची कुर्हाड कोसळली. सारी स्वप्ने धुळीला मिळाली. सारे जीवन अंधारमय झाले. अत्यंत असहयापणे राजाला घेऊन तिला उर्वरित आयुष्य काढायचे होते. समजाचे ठेकेदार पावलापावलावर तिच्या दु:खावर डागण्या देत होते. तिला मानाने जगणे असह्य होत होते.
मालती एक पत्नी, आई आणि स्त्री होती. तिला वैधत्वाचे दु:ख सहन करणे शक्य होते परंतु लाडक्या राजाच्या डोळ्यातील अश्रू पाहणे अशक्य होते. ती एक असा रस्ता शोधात होती, जेणेकरून राजाच्या अश्रुंचे हास्यात रुपांतर होईल ! पुढे तिला एका देव माणसाचा (अशोक कुमार) आधार मिळतो. व तिच्या अंधारमय जीवनात उजाळा येतो. अशी एका विधवेची हि कहाणी होती.