‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कंगना दिसणार पायलट आणि अम्मा च्या रूपात…
नेहमी चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात सापडणारी असणारी अभिनेत्री म्हणजे “कंगना राणावत” कंट्रोवर्सी क्वीन, अशी नव्यानं ओळख कंगनाची झाली आहे. मात्र हे वाद आणि चर्चा होत असतांना कंगनाचे कामही तेवढ्याच जोरात सुरु आहे. नुकताच कंगनाने तिचा बहुचर्चीत चित्रपट थलाइवीचे चित्रिकरण पूर्ण केले. तर आगामी बहुचर्चित चित्रपट तेजसचे चित्रिकरण सुरु केले. तेजस मध्ये कंगना भारतीय हवाई दलातील पायलटची भूमिका करणार आहे. तेजससाठी काही विशिष्ट हवाईपट्टीवर चित्रीकरण करण्याची परवानगी काढण्यासाठी कंगनानं थेट “संरक्षण मंत्री” “राजनाथ सिंह” यांचीही भेट घेतली. रोनी स्क्रूवाला यांचा आगामी तेजस हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच ती चर्चेत आहे.
हे देखील वाचा: सध्या बॉलिवूडमध्ये स्टार्स पेक्षा स्टारकिड्सचीच जास्त चलती!
या चित्रपटात भारतीय हवाई दलाची दमदार कामगिरी दाखवण्यात येणार आहे. यासाठी महिला पायलटच्या भूमिकेत कंगना राणावत आहे. सर्वेश मेवारा हे तेजसचे दिग्दर्शक आहेत. तेजसचे बरचसं चित्रिकरण बंगलोर हवाई पट्टीवर करण्यात येणार आहे. या संदर्भातच तेजसच्या सर्व टीमनं संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि आवश्यक ती परवानगीही काढल्याची माहिती आहे.
कंगनासाठी हा ड्रीम रोल आहे. आर्मीमध्ये भरती होण्याचं आपलं लहानपणापासूनचं स्वप्न असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं. भारतीय सैन्याचा आपल्याला अभिमान आहे. त्यामुळे हवाई दलातील पायलटची भूमिका करायला मिळाल्यानं आनंद झाल्याचं कंगनानं सांगितलं. या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु झालं असून नव्या वर्षात एप्रिलपर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे.
दरम्यान कंगनाचा आणखी एक चर्चेतील चित्रपट थलाइवी-द रिवॉल्यूशनरी लीडर. या थलाइवीचं चित्रीकरण पूर्ण झालं असून चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासाठी कंगनानं नकार दिला आहे. एएल विजय यांच्या दिग्दर्शनाखाली झालेला थलाइवी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची बायोग्राफी आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये प्रदर्शित होईल.
वास्तविक जूनमध्येच थलाइवी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा चांगलाच फटका या चित्रपटाला बसला. जवळपास सात महिने कोरोनमुळे चित्रपटाचे काम संपूर्णपणे थांबवण्यात आले. थलाइवीसाठी हैद्राबादच्या स्टुडीओमध्ये संसद भवनाचा सेट उभारण्यात आला होता. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर या सेटवरील कामही थांबवण्यात आले. त्यावर चित्रिकरण बाकी असल्यामुळे हा सेट तोडताही आला नाही. त्यामुळे या सेटच्या देखभालीसाठी जवळपास पाच करोड रुपये खर्च करण्यात आले.
नव्यानं शुटींग सुरु झाल्यावर या सेटची दुरुस्तीही करण्यात आली. या चित्रपटासाठी कंगनानं आपलं वजन वीस किलो वाढवलं होतं. आता या चित्रपटाचं प्रदर्शन मोठ्या पडद्यावर करण्यात येणार आहे. जयललिता अम्मा म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांची लोकप्रियता अफाट होती. त्यामुळेच आपल्या अम्माची भूमिका कंगनानं कशी केली आहे, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाकडून कंगनालाही मोठ्या आशा आहेत. एकूण एकीकडे ट्विटच्या माध्यमातूनक कंगना कितीही वादात असली तरी ती तिच्या कामाकडेही तेवढेच लक्ष देत आहे.