‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच एकत्र…
मागच्या वर्षी भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले होते. मात्र २०२१ हे नवीन वर्ष आपल्या देशासाठी आनंद घेऊन आले आणि कोरोना आटोक्यात आला. या महामारीच्या अति कठीण काळात अनेक लोकांनी स्वइच्छेने आरोग्यदूत म्हणून काम केले. यात लाखो आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच यांचा समावेश होता. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महामारीदरम्यान कार्य केले.
त्यांच्या याच कार्याला सन्मानित करण्यासाठी हे गाणे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने तयार केले आहे. ‘हिरो सरपंच’ नावाचे हे गाणे एक वेस्टर्न सॉन्ग असून ‘आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी’ असे या गाण्याचे बोल आहेत. चित्रपटातील हिरो हा एका काल्पनिक जीवनाचे प्रतीक आहे, तर गाव आणि गावाच्या विकासाचा खरा शिलेदार आणि खरा हिरो हा सरपंचच आहे.
या कठीण काळात हाच आरोग्यदूत असणारा सरपंच हिरो ठरला आहे. नुकताच या गाण्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय नामदार श्री प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला.
यावेळी श्री प्रवीण दरेकर म्हणाले, ” सरपंच या पदामुळेच गावाचा विकास होतो. आणि भारत हा खेड्यांचा, गावांचा देश आहे. त्यामुळे सरपंच गावाचा विकास करताना देशाचा सुद्धा विकास होत असतो.”
या गाण्याला संगीत देणारा आणि स्वरबद्ध करणारा अवधूत (Avdhoot Gupte) या गाण्याबद्दल सांगतो, “हे गाणं माझ्यासाठी खरंच खूप खास गाणं आहे. ह्या गाण्याला संगीत आणि आवाज देणे हे मी माझे भाग्यच समजतो. माझा थेट संबंध गावाशी, गावाच्या मातीशी असल्यामुळे मी समजू शकतो की, सरपंच आणि उपसरपंचाची भूमिका एका गावासाठी किती महत्वपूर्ण आहे. हीच भूमिका या गाण्यातून अतिशय समर्पक शब्दात नवनाथ काकडे यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवली आहे.”
तर गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde) सांगतात, ” हे गाणं तर नक्कीच स्पेशल आहे, मात्र ह्या गाण्याच्या निमित्ताने अजून एक स्पेशल गोष्ट घडली आहे, ती म्हणजे मी आणि अवधूत गुप्ते पहिल्यांदाच सोबत एक डुएट गाणे गात आहोत.
हे गाणे ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाले ते गीतकार श्री.नवनाथ काकडे यांनी सांगितले, ” सिनेसृष्टीने बऱ्याचदा सरपंचावर अन्याय केला आहे. त्याची प्रतिमा अनेक चित्रपटांमधून चुकीची दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. हीच प्रतिमा दुरुस्त होवुन सरपंचांची गरिमा आणि प्रतिष्ठा लोकांसमोर आणण्याचा हे गाणे म्हणजे एक भाग आहे. कोरोनाकाळात आरोग्यदूत असणाऱ्या या सर्व आजी, माजी सरपंचाना,उपसरपंचाना हे वेस्टर्न सॉन्ग प्रथमच आम्ही समर्पित करीत आहोत.”