दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सहकुटुंब सहपरिवार
कुणीतरी जादूची कांडी फिरवावी आणि आयुष्य २५ वर्षे पाठीमागे न्यावं तसाच काहीसा अनुभव सध्या येत आहे.
रोज घरात चालू असणार्या Reality shows, आणि Daily Soaps ची जागा रामायण, महाभारत या नव्याने चालू झालेल्या सीरिअल्सनी घेतली. त्या पाहताना कुटुंबातला एकत्रितपणा दिसू लागला.
Domino’s, MacDonald, Subway, Pizza Hut, चायनीज पदार्थ यांची गोडी संपून आता आईच्या हातची रुचकर चव चाखायला मिळतेय. तसेच कोल्डड्रिंक्सची जागा हळदीच्या दुधाने घेतली.
ऑनलाइन व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स ची गंमत कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, व्यापार यांसारख्या बैठे खेळांमध्ये रंगू लागली.
ज्या मित्र-मैत्रीणिंची आठवण फक्त खास गोष्टींना किंवा कामासाठी काढली जायची आज त्यांच्याशीच बालपणीच्या आठवणी मोबाइलद्वारे ताज्या होऊ लागल्या. घरात बसून काय करावे म्हणून का होईना मोबाईल विश्वाच्या बाहेर येऊन घरच्यांशी गप्पा होऊ लागल्या.
सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन सकाळ-संध्याकाळी जेवणं होऊ लागली. घरी सगळे असल्याची संधी मिळाल्याने आई घरची साफसफाई काढू लागली. कारण त्यावेळी मोलकरणी एवढ्या मिळतच नव्हत्या.कोरोनाच्या भीतीने का होईना मात्र बाहेरून घरी आले की प्रत्येक वेळी हातपाय धुणे compulsory झालंय. जे आजकाल आळशीपणामुळे काही प्रमाणात बंद झालं होतं.
कधीही शुद्ध नसलेली हवा आता मोकळा श्वास घेऊ लागली कारण रस्त्यावरती धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली. धकाधकीचं आयुष्य काही प्रमाणात सुखकर झालं. सिमेंटच्या या जंगलात फक्त मोठ्या इमारती दिसत होत्या मात्र आता याच जंगलात प्राणी-पक्षी मनमोकळे फिरताना दिसू लागले.
पाळणाघरात राहणाऱ्या बाळांना त्यांच्या आई-बाबांची २४ तास सोबत मिळू लागली. संस्कार आणि शिस्तीचे धडे घरात मिळू लागले. कारण आजच्या इतकी पाळणाघरे त्यावेळी नव्हतीच मुळी.
परिस्थितीमुळे का होईना लोकांच्या गरजा कमी झाल्या. जीवनावश्यक गरजा कोणत्या? याचा जणू साक्षात्कार झालेलं चित्र दिसतंय सध्या. शहरात राहून शहरातलेच झालो! म्हणणाऱ्याला स्वतःच्या गावाची ओढ लागली. सकाळी संध्याकाळी देवपूजा होऊ लागली आणि या परिस्थितीतून बाहेर पडावे म्हणून प्रार्थना होऊ लागल्या.
Zomato,Uber वर ऑर्डरी बंद झाल्या. कारण कितीही भूक लागली तरी घरची चटणी-भाकर गोड लागत होती.
भारतीय संस्कृतीला नको म्हणणारे देखील आज Shake-hand न करता हात जोडून नमस्कार करू लागले.
खरंच जादू झाली आणि आयुष्य rewind झालं!
अविश्रांत, भावनाशून्य चालणाऱ्या मशीनला ब्रेक लावला!
लोकडाउनच्या काळात माणूसकी आणि घरपण दिसू लागलं.
– भूषण पत्की Twitter @bhushanpatki