Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘बावर्ची’ आणि Lagaan मधील गाण्यांचं इंटरेस्टिंग कनेक्शन!

Dharmendra आपल्याच चित्रपटाच्या प्रीमियरला का गैरहजर का राहिले होते?

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

भारतीय सिनेमा आणि पोस्टल स्टॅम्पस्

 भारतीय सिनेमा आणि पोस्टल स्टॅम्पस्
आठवणींच्या पानावर

भारतीय सिनेमा आणि पोस्टल स्टॅम्पस्

by Kalakruti Bureau 04/05/2020

भारतीय सिनेविश्वाला शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेमाचे जनक मानले जातात. त्यांनी पहिला मूक चित्रपट हा ३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित केला. आणि तेव्हापासून लोकांनी चित्रपट या संकल्पनेला खरोखरीच डोक्यावर घेतले. त्यांनी त्या काळात केवळ मनोरंजनाचे नवीन माध्यम तयार केले नाही तर भारताला जगात एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

त्यानंतर ‘आलम आरा’ नावाचा पहिला बोलका चित्रपट प्रदर्शित झाला. आणि मग सुरू झालेला हा चित्रपट सृष्टीचा सिलसिला नंतर पुढे थांबलाच नाही. १९४० मध्ये झालेल्या क्रांतिकारी चळवळींचा प्रभाव देखील सिनेमांवर पडला नाही. उलट ४० तसेच ५० चे दशक विशेष उल्लेखनीय होते. या काळात एस. डी. बर्मन, मदन मोहन यांचे संगीत अजरामर झाले. त्यानंतर राज कपूर, गुरुदत्त, आसिफ, बिमल रॉय यांनी एक से एक चित्रपट प्रदर्शित केले. पुढे पुढे बदलत्या काळाप्रमाणे चित्रपटांच्या कथा, स्वरूप बदलत गेले. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून ९० च्या दशकात रोमॅंटिक सिनेमे जास्त प्रमाणात आले.

आणि आता २१ व्या शतकात भारतीय सिनेविश्वाला जगात मान्यता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या पुरस्कार सोहळ्यांमध्ये स्वतःचे मानाचे स्थान निर्माण केले आहे. इतकेच नाही, तर ज्याप्रमाणे परदेशात आपले चित्रपट लोक आवडीने बघत आहेत त्यांचे कौतुक करत आहेत. त्याचप्रमाणे भारतात देखील विविध प्रकारे या बॉलीवुडचा सन्मान, त्यात काम करणार्‍या कलाकारांचा आदर, सत्कार वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. त्यातील एक म्हणजे आपले भारतीय डाक सेवा होय.

भारतीय डाक सेवा यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळापासून चालत आलेल्या या सेवेत पोस्टल स्टॅम्पस् खूप महत्वाचे काम बजावतात. जेव्हा भारतीय सिनेमाला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांनी ५० प्रसिद्ध कलाकारांच्या स्मृतीत ६ मिनीएचर शीट काढल्या. त्या व्यतिरिक्त ९ डाक तिकीटांच्या पहिल्या २ मिनीएचर शीट मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांचे चित्रण आहे.

आत्तापर्यंत त्यांनी प्रकाशित केलेल्या स्टॅम्पस् बद्दल काहीशी माहिती जाणून घेऊया,

दादासाहेब फाळके यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांनी स्टॅम्प तयार केला. इतकेच नाही तर ‘राजा हरिश्चंद्र’ नावाचा पहिला चित्रपट, भारतीय चलचित्राची ७५ वर्षे, बाल चित्र समिति अशा अनेक घटनांवर स्टॅम्पस् तयार केले आहेत.

ज्योतीप्रसाद अग्रवाल, एवी मेयप्पन आणि के. सुब्रमण्यम इत्यादि डिरेक्टर्स वर स्टॅम्पस् भारतीय डाक यांनी काढले.

गुरुदत्त, सत्यजित रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय, राज कपूर यांच्यावर स्टॅम्पस् आहेत. त्यातही विशेषता म्हणजे राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर फॅनपोस्टच्या स्वरुपात दोन स्टॅम्प आहेत.

याचबरोबर एल. वी. प्रसाद , महबूब खान, व्ही. शांताराम, बी. एन. रेड्डी, एस. एस. वसन यांचेही स्टॅम्पस् आहेत.

भारतीय चित्रपट जगतातील अभिनेत्रीमध्ये देविका राणी, नूतन, कानन देवी, सावित्री, मीना कुमारी, लीला नायडू तसेच नर्गिस, हेमा मालिनी, मधुबाला, पद्मिनी, ललिता आणि रागिनी त्रावणकोर यांचे भारतीय डाकने यांनी काढलेले स्टॅम्पस् आपण बघू शकतो.

भारतीय डाक ने स्टॅम्पस् काढलेल्या यादीत बरेच अभिनेते, निर्माते देखील आहेत. यात पृथ्वीराज कपूर, जेमिनी गणेशन, शिवाजी गणेशन, डॉ. राजकुमार, एन. टी. राम राव, डॉ. एम. जी. रामचंद्रन्, कुंदन लाल सेहगल, जयशंकर या दिग्गजांचा समावेश होतो. विशेष म्हणजे उत्तम कुमार यांच्यावर भारतीय डाक सेवेने बुकलेट काढले आहे.

भारतीय डाक ने केवळ हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले नसून, एकंदरीतच विविध भाषांमधील कलाकरांचा गौरव या स्टॅम्पस् स्वरुपात केला आहे. त्यामुळे भारत देशात प्रत्येक चांगल्या कामाचे कौतुक केले जाते. जसे इथे भारतीय डाक सेवेने कलाकारांचे केले आहे.

-विपाली पदे

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Cinema Entertainment Indian Cinema Stamp
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.