Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

ट्रोल गेमला अभिषेकचे उत्तर
बॉलिवूडशी रिलेटेड कोणत्याही गोष्टी बाहेर आल्या, की त्यावर गॉसिप आणि पर्यायी त्याचे मिम्स होणे हा सध्या ट्रेंडच बनलाय. बच्चन कुटुंबीयसुद्धा याला अपवाद ठरले नाहीत. कोरोनाशी युद्ध करत असतानाच अभिषेकला, एकीकडे या ट्रोल गेमलाही सामोरं जावं लागतंय.मात्र अशाच ट्रोलिंगला अभिषेकने योग्य उत्तरसुद्धा दिलंय.
अभिषेक आणि अमिताब बच्चन हे सध्या मुंबईच्या नानावटी हॉस्पिटल मध्ये कोरोना विरुद्धची लढाई लढत आहेत.साधारण तीन आठवड्यांपूर्वी ही टेस्ट पॉसिटीव्ह आली होती. ऐश्वर्या आणि आराध्या यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली असली तरी आता त्या दोघी ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. पण बिग बी आणि अभिषेक अजून रिकव्हर होत आहेत..
परंतु या दरम्यान, नेटकाऱ्यांना ट्रोल करण्यासाठी एक नवीन विषय मिळाला आहे.. वडिलांची संपत्ती आणि अभिषेकचं घरी असणं, या गोष्टींचा मुद्दा बनवून नेटकाऱ्यांनी मिम्स बनवायला सुरवात केली आहे.
याच विषया संबंधी काही ट्विट्स सध्या व्हायरल होताना दिसतात.. यात अभिषेकला ट्रोल करताना म्हंटल आहे की.. ” गेट वेल सून सर, हर किसी की किस्मत मे लेट के खाना कहा..”
अभिषेकनेही त्यावर रिट्विट करताना उत्तर दिलं आहे, “फिलहाल तो लेट के खा रहे हे दोनो एक साथ अस्पताल मे..🙏🏻”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बच्चन घरण्यासोबत सुरू झालेल्या ट्रोल गेमची, चला एक झलक बघू या ट्विट्स वर..

