‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शहीद भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित ‘हे’ चित्रपट पाहिले का?
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या क्रांतिवीरांमध्ये हुतात्मा भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांचं नावही आदराने घेतलं जातं. या तिन्ही क्रांतिवीरांचा जीवन प्रवास जीवंत ठेवण्यासाठी बॉलिवूडची विशेष कामगिरी आहे. ‘शहिदे आझम-भगतसिंह’, ‘रंग दे बसंती’, ‘शहीद’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रवास उलगडण्यात आला आहे.
१) १९५४ साली ‘शहिदे आझम-भगतसिंह’ हा चित्रपट आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन जगदीश गौतम यांनी केलं होतं.
2) अभिनेते शम्मी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘शहीद भगतसिंह’ हा चित्रपट १९६३ साली प्रदर्शित करण्यात आला. के.एन.बन्सल यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शकीला, प्रेमनाथ, उल्हास आणि अचला सचदेव या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.
3) १९६५ सालच्या ‘शहीद’ चित्रपटात मनोज कुमार यांनी भूमिका केली. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. १३ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ कथेचा पुरस्कार या चित्रपटानं पटकवला होता.
हे ही वाचा : शहीद भगतसिंह यांच्या आठवणींना उजाळा
4) २००२ साली साकारण्यात आलेला ‘शहीद-ए-आझम’ चित्रपटात अभिनेता सोनू सूद मुख्य भूमिकेत झळकला.
5) २००२ मध्ये ‘२३ मार्च १९२३: शहीद’ चित्रपटात अभिनेता सनी देओल, बॉबी देओल आणि अमृता सिंह यांनी मुख्य भूमिका केली होती.
6) अभिनेता अजय देवगणचा ‘द लेजंड ऑफ भगवत सिंग’ चित्रपट २००२ मध्ये आला. भगतसिंह यांच्या थरारक प्रवासाचं चित्रण केलं आहे.
7) मिस्टर परफ्केनीस्ट अमिर खानचा ‘रंग दे बसंती’ चित्रपटावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहर उमटवली. भगतसिंह आणि इतर देशभक्तांचा तरुणाईवर असणारा प्रभाव या चित्रपटातून दिसून येतो.