दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अवतारची प्रतीक्षा
अवतार….हॉलिवूडच्या या चित्रपटांनी अनेक विक्रम केले आहेत. आजही टिव्हीवर अवतार सिनेमा लागला तरी हमखास बघितला जातो. या चित्रपटाच्या दुस-या भागाचे चित्रीकरण नुकतेच न्युझिलंड येथे पूर्ण करण्यात आले. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असले तरी चित्रपट पडद्यावर बघण्यासाठी रसिकांना 2022 पर्यंत वाट बघावी लागणर आहे.
जैम्स कैमरुन लिखीत आणि दिग्दर्शित अवतार हा चित्रपट सर्वाधिक यशस्वी हॉलिवूडपट ठरला आहे. 2009 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन हजार अब्ज पेक्षाही अधिक अमेरिकी डॉलर्सची कमाई केली होती. त्या वेळेपासूनच अवतारच्या पुढच्या भागांची उत्सुकता होती. या चित्रपटाचे किमान पाच भाग तरी येतील अशी घोषणा खुद्द कैमरुन यांनी केल्यामुळे पहिल्या भागानंतर पुढच्या टप्प्यातील अवतार कधी बघता येईल याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले होते.
2021 डिसेंबर अखेर अवतार 2 पडद्यावर येणार होता. पण त्यालाही कोरोनाचे ग्रहण लागले. कोरोनामुळे सर्व शुटींग थांबवावे लागले. त्यामुळे साडेचार महिन्याच्या गॅपनंतर न्युझिलंड येथे अवतार 2 च्या चित्रीकरणाची सुरुवात झाली. त्यातील केट विन्सेटचा फोटो सध्या सोशल मिडीयावर लोकप्रिय झाला आहे. केटनं पाण्यात सात मिनीटं चौदा सेकंद श्वास रोखून एक सीन शूट केला. त्या सीनच्या तिच्या फोटोवर सध्या अवतारच्या चाहत्यांच्या लाईकचा पाऊस पडत आहे. यावरुन अवतार 2 चा महत्त्वपूर्ण भाग पाण्याखाली शूट केला जाणार आहे हेही स्पष्ट झाले आहे.
जेम्स कैमरुन यांनी एका वेबसाइटला दिेलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती सांगितली आहे. एक आठवडाभर चाललेल्या शुटींगमध्ये एकूण आठ कलाकारांनी पाण्याखाली चित्रीकरण पूर्ण केले. त्यात एका सात वर्षीय मुलाचाही समावेश आहे. अवतार 2 पहिल्यांदा 17 डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता झालेल्या विलंबानं हा चित्रपट डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शत केला जाणार असल्याचंही जेम्स कैमरुन यांनी स्पष्ट केलं आहे. यात अवतारच्या प्रेमींसाठी चांगली बातमी म्हणजे जेम्स कैमरुन यांनी अवतार 2 च्या शुटींगसोबत अवतार 3 चेहीजवळपास 90 टक्के चित्रिकरण पूर्ण करुन घेतले आहे. त्यामुळे अवतार 2 ला जसा वेळ लागला तसा अवतार 3 ला कदाचित तसा वेळ लागणार नाही.
अवतार मध्ये सैम वर्थिंगटन, जोई साल्डाना, स्टीफन लैंग, मिशेल रोड्रिग्स जोएल डेविड मूर, जिओवानी रिबिसी आणि सिगौरनी व्हिवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात 2154 चा काळ दाखवण्यात आला आहे. मानवानं पृथ्वीवरील संपूर्ण उर्जा संपत्तीचा वापर केला आहे. आता त्याला नवीन उर्जा हवी आहे. या शोधात पॅडोरा नावाच्या ग्रहाचा शोध लागते. येथे कधी न संपणारी उर्जा असत. ही उर्जा पूर्णपणे मिळवण्यासाठी मग पॅडोरोवरच नियंत्रण घेण्याचा प्रयत्न सुरु होतो. त्यातून मानव आणि पॅडोरा ग्रहावरील मूल निवासी यांच्यात युद्ध सुरु होते.
अवतारचे अॅनिमेशन हा चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटानं अनेक विक्रम केले. त्यामुळे अवतार 2 कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक आहेत. हे जाणूनच जेम्स कैमरुन यांनी या भव्य चित्रपटाची आखणी केली आहे. चित्रपटाचे काही फोटो सोशल मिडीयावर उपलब्ध आहेत, त्यावरुन तरी अवतार 2 हा सर्व चित्रपटात सरस ठरणार हे स्पष्ट होतंय….