‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
द व्हाईट टायगर
देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी आणि आता विदेशी सून झालेली प्रियंका चोप्रा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. राजकुमार राव सोबत प्रियंकाचा द व्हाईट टायगर हा चित्रपट डिसेंबर महिन्यात काही मोजक्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तर 22 जानेवरी 2021 रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. खुद्द प्रियंकानेच आपल्या सोशल मिडायावर द व्हाइट टायगर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. तसेच या चित्रपटात भूमिका करायला मिळाली म्हणून तिने आनंदही व्यक्त केला आहे. प्रियांका चोप्रा, सौ.जोनास झाल्यापासून बॉलीवूडमध्ये खूप मोजक्या चित्रपटात दिसली आहे. बाजीराव चित्रपटानंतर प्रियंका द स्काई इज पिंक या चित्रपटात दिसली होती. मात्र आता द व्हाईट टायगर या अरविंद अडीगा यांच्या पुस्तकावर आधारीत चित्रपटात प्रियंका असल्यानं तिच्या चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळेच द व्हाईट टायगरच्या टीझरने लाखो लाईकचा टप्पा पार केला आहे.
2008 मध्ये अरविंद अडीगा यांची द व्हाईट टायगर नावाची कादंबरी आली होती. या कादंबरीनं लोकप्रियतचे रेकॉर्ड तोडले. अनेक आठवडे हे पुस्तक बेस्ट सेलरच्या यादीत वरच्या क्रमांकावर होतं. 40 वा बुकर पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला. याशिवाय न्यूयॉर्क टाइम्सची सर्वोत्कृष्ट विक्रेता म्हणून या कादंबरीला स्थान मिळाले होते. गरीब आणि श्रीमंतामधील दरी, त्यात जातीचे राजकारण, सोबतीला धर्म, भ्रष्टाचार आणि या सर्वाचा प्रभाव पडत असलेले एका सामान्य माणसाचे जीवन… अशी कथा द व्हाईट टायगर मध्ये आहे.प्रियंका चोप्रा, राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांनी ही कथा पडद्यावर आणली आहे. आदर्श गौरव या नवोदीत अभिनेत्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यात तो प्रियंका आणि राजकुमार यांच्यासोबत असला तरी कुठलाही नवखेपणा त्यात दिसत नाही. या तिघांचा तोडीस तोड अभिनय आणि चित्रपटाच्या कथेतील वेगळेपण यामुळे द व्हाईट टायगरच्या टीझरला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
चित्रपटात आदर्श गौरव हा बलराम हलवाई म्हणून व्यक्तीरेखा साकारत आहे. हाच बलराम प्रेक्षकांना चित्रपटाची कथा सांगत पुढे नेतो. प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव हे श्रीमंत एनआरआई जोडपं आहे. काही कारणासाठी ही दोघंही भारतात येतात. त्यांच्याकडे बलरामला ड्रायव्हरची नोकरी मिळते. भारतात आल्यावर या जोडप्याचा हरकाम्या नोकर म्हणूनच बलरामला काम करावे लागते. पुढे या परदेशी जोडप्यामुळे बलरामच्या आयुष्याला वेगळं वळन मिळते. अत्यंत गरीब घरातून आलेला बलराम या श्रीमंत जोडप्यासोबत राहून आपणही श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागतो… त्याची स्वप्न वास्तवात येतात का, हे बघण्यासारखे आहे.
रामिन बहरानी हे व्हाईट टायगरचे दिग्दर्शक आहेत. मुकूल देवरा चित्रपटाचे सह निर्माते आहेत. यात महेश मांजरेकरही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.
सध्या सोशल मिडीयावर प्रियंका जोनास यांची चांगलीच चर्चा आहे. प्रियंका वी कैन बी हीरोज, द मै्ट्रिक्स 4, सिटाडेल या हॉलिवूडपाटात दिसणार आहे.तिच्या या हॉलिवूड पटांसह द व्हाईट टायगर या बॉलिवूडपटात प्रियंका तिची पूर्वीची अभिनयाची जादू करते ते लवकरच समजणार आहे.