दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मिटुनी लोचने घे भिरभिरती या गाण्याचा इतिहास
काही गाण्यांची जन्मकथा खूप रंजक असते. चित्रपट निर्माण होताना त्या गाण्याचा विचार झालेला नसतो आणि मग चित्रपट निर्माण झाला की त्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या वेळी किंवा चित्रपटाच्या एडिटिंग च्यावेळी एखादी गाण्याची नेमकी जागा सापडते आणि मग गाणे लिहावे, असे ठरते.
‘नटसम्राट’ चित्रपटाच्या वेळी नातीच्या जन्माच्या वेळचा एक प्रसंग आहे आणि मग हळूहळू ती नात मोठी होते. अशा दृश्याच्या वेळी काही मोंटाजेसच्या माध्यमातून कथा पुढे नेणारे एक गीत असावे, असे महेश मांजरेकरयांच्या मनात आले. ही गोष्ट घडली होती ती चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यावर! संगीतकार अजित परब याने गीतकार गुरु ठाकूरला ‘अंगाई’च्या फॉर्ममध्ये बसणारे एक गीत लिहायला सांगितले.
आणखी एक गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे हे गीत टाइम लॅप्स गीत असणार होते. म्हणजे असे की त्या गाण्यातून चित्रपटाची कथा आणि चित्रपटाचा काळ हादेखील पुढे जाणार होता. ती नात मोठी होणार, असे सुद्धा त्या गाण्यातून आपल्याला दिसते. नटसम्राट मध्ये संगीतकार अजित परब यांनी संगीतबद्ध केलेलं कुसुमाग्रजांचे एक गीत आधी रेकॉर्ड झाले होते. त्यामुळे चित्रपटाचे कथानक ज्या काळात घडते, त्या काळाशी नातं जोडणारे शब्द लिहिणे आवश्यक होते.
गुरूच्या लेखणीतून शब्द उमटले’
मिटुनी लोचने घे भिरभिरती
सूर नांदीचे बघ दरवळती
लालचुटुक मखमली आता
अलगद ही उमलेल भारुनिया
अवकाशच अवघा, खेळ नवा रंगेल”
संगीतकार अजित परब यांनी खूप उत्कृष्ट संगीत या गीताला दिले आहे. हे गाणे बघताना तुमच्या लक्षात येईल की नातीचा जन्म, तिची शाळा, आजोबा आणि तिचे नातं हे सगळं उलगडत नेणारे हे गीत आहे. मुळात या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा ही एका नटाची असल्याने गुरु ठाकूरने लिहिलेले शब्दकिती योग्य होते, हे जाणवेल.
नवीन नांदी नवी संहिता, हवी हवीशी नवी भूमिका पात्र होऊनी विरघळताना, गात्र गात्र बहरेल “संगीतकार अजित परब म्हणाला,” चित्रपटात लिपसिंक चे गाणे आणि मोंटाज पद्धतीने पुढे जाणारे गीत यात खूप फरक आहे. मोंटाज पद्धतीने दृश्यातून पुढे जाणारी कथा आणि ते गीत यांचा संगीतकार या नात्याने विचार करताना खूप वेगवेगळे दृष्टिकोन मिळतात आणि त्यामुळे मी संगीतबद्ध केलेलं ‘नटसम्राट ‘मधील हे गीत मला विशेष आवडतं.”
================
हे ही वाचा: भारताच्या माजी पंतप्रधानांनी वाचवले होते डिंपल कपाडियाचे प्राण
================
या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांसाठी अनेक गाणीगायलेला सुप्रसिद्ध गायक विजय प्रकाश याचा स्वर या चित्रपटासाठी वापरलाआहे. संगीतकार अजित परब याच्या संगीत दिग्दर्शनाने आणि विजय प्रकाशयाच्या धीरगंभीर स्वरांनी या गीताला न्याय मिळाला आहे.