‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
नया दौर १९५७
‘बी. आर. फिल्म्स’ – पाच दशकांचा सुरेल प्रवास
नया दौर (Naya Daur) काल्पनिक विषयावर आधारित असला तरी त्यामध्ये पारंपरिक रूढीवादी अशिक्षित, परंतु प्रेमळ ग्रामीण समाज व आधुनिक, तंत्रज्ञान यामध्ये समन्वय कसा गाठता येईल याचा सुंदर विचार मांडला होता. यामध्ये कुंदन (खलनायक जीवन) हे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे. (Naya Daur movie 1957 by B R Chopra)
हे देखील वाचा: बी आर चोप्रांनी निर्देशित केलेला हा प्रथम चित्रपट अफसाना (१९५१)
त्याला शहरापासून दूर असलेल्या एकाकी खेड्यात, वृक्षांची खोडे कापण्यासाठी लाकडी फळ्या बनविण्यासाठी विजेवर चालणाऱ्या करवली सुलभ आणि जलद वाहतुकीसाठी वाहन (गाडी) आणायची आहे.
त्या खेड्याचे आर्थिक, सामाजिक, जातीधर्माचे प्रश्न आहेत शहरातून गावी आलेल्या सुंदर रजनीमुळे (वैजयंतीमाला) शंकर टांगेवाला (दिलीप कुमार– Dilip Kumar) व सुतार (अजित) या एकेकाळच्या दोन मित्रांमुळे वैरभाव निर्माण झालेला आहे.
पारंपरिक तंत्रज्ञानाचे महत्व विशद करण्यासाठी यामध्ये सर्व गावकरी श्रमदान करून रस्ता बनवतात व बस इतकेच टांगाही वाहतुकीचे महत्वाचे साधन आहे. हे सिद्ध करतात.
माणुसकी आणि सहकारी तत्वाचा अवलंब करून नव्या व जुन्या तंत्रज्ञानामध्ये समन्वय कसा गाठता येईल यांचा सुंदर विचार शेवटी सेठ मगनलाल नाझीर हुसैन यांनी मांडला आहे.