मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
द गर्ल ऑन द ट्रेन… क्षणाक्षणाला वाढणारी उत्सुकता…
परिणिती चोपडाचा नवा लूक आणि त्या लूकला साजेसा तिचा अभिनय… सोबत अदिती राव हैदरी आणि किर्ती कुल्हारी या दोन गुणी अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी बघायची असेल तर द गर्ल ऑन द ट्रेन चित्रपट नक्की बघा.
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला समिक्षकांनीही पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. रिभु दासगुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट क्षणाक्षणाला रोमांचक होत जातो. द गर्ल ऑन द ट्रेन या हॉलिवूडपटावर आधारीत हा चित्रपट आहे. मात्र परिणिती चोपडाचा (Parineeti Chopra) अप्रतिम अभिनय आणि रिभु दासगुप्ता यांचे चोख दिग्दर्शन यामुळे संवाद कमी असले तरी चित्रपट प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवतो.
26 फेब्रुवारीला द गर्ल ऑन द ट्रेन नेटफ्लीक्सवर रिलीज झाला. एका मर्डर मिस्ट्रीची कथा चित्रपटात आहे. परदेशात चित्रपटाचं शूट झालं आहे. यात परिणिती एका वकीलाच्या भूमिकेत आहे. तिच्या नव-याच्या भूमिकेत अविनाश तिवारी आहे. एकमेकांवर प्रेम करणा-या या दोघांच्यामध्ये आता तिसरा पाहुणा येणार आहे. बाळाच्या चाहुलीमुळं परिणिती खुष असते . मात्र तेव्हाच तिला एक मोठा अपघात होतो. यात परिणिती वाचते. मात्र तिचं बाळ जातं. आणि डोक्यावर मार लागल्यामुळे तिला अमेंशिया म्हणजेच विसरण्याचा रोग होतो.
इथूनच चित्रपट वेगळं वळण घेतो. परिणिती आपल्या कामाच्या निमित्तानं रोज ठराविक ट्रेननं प्रवास करते. या प्रवासादरम्यान अनेक ओळखी होतात. त्यातलाच एक चेहरा म्हणजे अदिती राव हैदरी. परिणिती रोज प्रवास करतांना या तरुणीचा चेहरा बघते. आपल्या नव-यासोबत खूषीत राहणारी अदिती, परिणिती रोज ट्रेनमधून बघते. तिला तिच्यामध्ये आपला भूतकाळ दिसतो. याच अदितीचा मर्डर होतो. या खूनाचा आळ परिणितीवर येतो. येथे तपास अधिका-याच्या रुपातील कीर्ति कुल्हारी या गुणी अभिनेत्रीची एन्ट्री होते. मग जवळपास दोन तासांच्या या चित्रपटात अधिक रंजकता येते. अपघातानंतर परिणिती आपल्या भूतकाळातील घटना विसरत चालली आहे. अशावेळी आपल्यावर खूनाचा आरोप आला आहे. आणि यातून वाचण्यासाठी ती स्वतः ख-या खून्या तपास सुरु करते. पुरावे गोळा करते.
हे वाचलंत का: एका साध्या घरातील मुलगी ते रेड कार्पेटवरील सेलिब्रिटी
परिणिती चोपडाचा हा पहिलाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. जवळपास दोन तासांच्या या चित्रपटात परिणितीनं प्रेक्षकांना बांधून ठेवलं आहे. सर्वात कमाल परिणितीनं केली आहे. एक अल्कोहल ग्रस्त आणि अमेंशिया आजाराला त्रस्त झालेल्या महिलेची तिनं केलेली भूमिका सरस ठरली आहे. या गूढ चित्रपटामध्ये खरा खूनी नेमका कोण आहे, ही उत्सुकता शेवटपर्यंत ताणली जाते. चित्रपटातलं एकमेव गाणं, मतलबी यारीयांही छान जमलं आहे.
परिणितीनं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिनं वजन कमी केलं आहे. त्यामुळे द गर्ल ऑन द ट्रेन मध्ये तिचा लूक खूपच फ्रेश वाटतोय. ओटीटीमुळे घराघरात चित्रपट पोहचत आहे, हे सांगून परिणितीनं आनंद व्यक्त केला.