‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
राघव जुयालची नवी इनिंग….
नृत्याची आवड असणा-या तरुण वर्गात, सध्या राघव जुयाल या नावाचा चांगलाच बोलबाला आहे. मुळ देहरादूनचा असलेला राघव कोरिओग्राफर म्हणून काम करतो. तसेच तो उत्कृष्ट सूत्रसंचालकही आहे. क्रोकरोज या नावानं प्रसिद्ध असलेल्या राघवनं फक्त टीव्हीवर बघून नृत्याचा सराव केला. 2012 मध्ये झालेल्या डीआयईडी सीजन 3 मध्ये राघव सेकंड रनरअप होता. त्यानंतर डीआयईडीच्या पुढच्या भागांचा तो सूत्रसंचालक झाला. त्याच्या भन्नाट सूत्रसंचालनानं कार्यक्रम रंजक झाला. अचूक टायमिंग हे राघवचं वैशिष्ट्य.
आता हाच राघव पुन्हा चर्चेत आहे, तो कलर्स चॅनेलवर (Colors TV) होणा-या डान्स दीवाने-3 या कार्यक्रमानिमित्तानं. धकधकगर्ल माधुरी दीक्षितच्या या कार्यक्रमात प्रमुख सूत्रसंचालक म्हणून राघव जुयालची एन्ट्री झाली आहे. खुद्द माधुरी दीक्षितनं (Madhuri Dixit) राघवच्या नावाचा आग्रह धरला होता आणि त्याला कलर्सकडे वळवले. 27 फेब्रुवारीपासून सुरु होणा-या डान्स दीवाने-3 मध्ये प्रमुख जज म्हणून माधुरी दीक्षित असणार आहे. तर नृत्यदिग्दर्शक धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया हे सह-जज म्हणून काम बघणार आहेत. आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राघव जुयाल त्याच्या खास शैलीत करणार असल्यामुळे डान्स दीवाने-3 अधिक रंगतदार होणार आहे.
देहराडूनमधील एका सामान्य कुटुंबातील राघव जुयाल (Raghav Juyal) याचा संघर्ष तरुणांसाठी मार्गदर्शक आहे. 2012 मध्ये आलेल्या डीआईडी मधून राघव बॉलिवूडमध्ये दाखल झाला. तेव्हाही ऑडीशनल्या आलेल्या तरुणांमध्ये आपल्या स्वभावानं लोकप्रिय ठरला होता. मात्र घरी टीव्हीसमोर नृत्याचे धडे घेतलेल्या राघवला तेव्हा ट्रेडडान्सर नसल्यामुळे पहिल्यांदा नकार मिळाला होता. मात्र नंतर ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी त्याची ऑडीशन बघितली आणि त्याला या शो मध्ये वाइल्ड कार्ड एंन्ट्री मिळाली. या एका संधीचं राघवनं सोनं करुन दाखवलं. डीआईडी सीजन 3 मध्ये राघव सेकंड रनरअप ठरला. बोलघेवड्या स्वभावाचा हा मुलगा त्यानंतर नृत्याबरोबर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतही दिसू लागला. डीआईडीच्या पुढच्या सगळ्या भागांचे सूत्रसंचालन राघवनं केले. आता हाच राघव कलर्स चॅनेलवर दिसणार आहे.
हे देखील वाचा: माधुरीच्या ‘एक दो तीन’ या गाण्यामागील ही ‘भन्नाट’ गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?
नृत्य आणि सूत्रसंचालनाबरोबर राघव अभिनयातही पुढे आहे. रमेश सिप्पी यांच्या सोनाली केबल या चित्रपटात राघवनं भुमिका केली आहे. याशिवाय प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो दिग्दर्शित एबीसीडी 2 (ABCD 2 Movie) मध्येही राघवनं मध्यवर्ती भूमिका केली होती. याशिवाय स्ट्रीट डान्सर, बहुत हुआ सम्मान या चित्रपटातून आणि अभय-2 या वेब सिरीजमधून राघवनं भूमिका केली आहे. राघवकडे एका मोठ्या बॅनरचा चित्रपट असून त्याचे काम चालू आहे. या चित्रपटासाठी राघवनं आपलं वजनंही कमी केलं आहे.
आता राघव माधुरी दिक्षितसोबत डान्स दीवानेमध्ये (Dance Deewane) काम करता येणर म्हणून आनंदात आहे. माधुरी दीक्षित सहकलाकांरानं बरोबरीनं वागवतात. त्यांना सहकलाकारांचे कायम कौतुक असते त्यामुळेच हा शो करतांना आनंद मिळत असल्याचे राघवनं स्पष्ट केलं आहे. या कार्यक्रमात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत असे सगळ्या वयोगटातील नृत्याचे चाहते सहभागी झाल्यानं एखाद्या कुटुंबासारख सेटवरचं वातावरण असल्याचंही राघवनं सांगितलं. एका साधारण कुटुंबातून आलेल्या राघव जुयालचा प्रवास नक्कीच मोठा आहे.