दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सुवर्णकमळ विजेत्या… सर्जनशील, संवेदनशील सुमित्रा भावे!
सुमित्रा भावे… (Sumitra Bhave)
७८ वर्षांचं आयुष्य… ७ राष्ट्रीय पुरस्कार..
आणि सिनेरसिकांसाठी आयुष्यभर पुरणारं संचित…
The Disciple या चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित सिनेमात तुमचा आवाज ऐकायला मिळेल तो ऐकायची ओढ उरलेय…..
पण बाकी किती काही देऊन गेलात तुम्ही… त्या सर्व कळत नकळत तुमच्याकडून शिकलेल्या सर्वांना…
सुमित्रा मावशी… खूप खूप प्रेम!❤️🙏 काही माणसं अमर रहावीत, कधीच जाऊ नयेत असं मला वाटायचं त्यापैकी एक म्हणजे सुमित्रा भावे🙏अर्थात त्या अमरत्वावर तुमचा आणि माझा विश्वास नाही तरीही...
प्रेक्षकांना नवी दृष्टी तुम्ही दिलीत..जीवन आणि समाज यांचं प्रतिबिंब तुमच्या चित्रपटात दिसलं तेव्हा एक समृद्ध नजर मिळाली सिनेमा पाहण्याची.. तो सिनेमा जागतिक महोत्सवात आपलासा झाला तो तुमच्यामुळे… अभिमानाने छाती भरून यायची तुमचा सिनेमा पाहून.. की हा आहे माझा ‘मराठी सिनेमा’ … कासव, अस्तु, दिठी, देवराई, १०वी फ, संहिता, दोघी, बाधा, नितळ… एकसे बढकर एक चित्रपट.. तुमच्या सिनेमांनी जीवनदृष्टी दिली..माणूस म्हणून घडवलं.. संहिता हा चित्रपट त्या अविस्मरणीय गाण्यांसह मनाला स्पर्शून गेला होता.. देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव… अत्यंत unique combination…. शैलेंद्र बर्वे यांचं संगीत.. आरती अंकलीकर यांचा दैवी आवाज.. सगळंच नितांत सुंदर…
देवराई… या सिनेमाबद्दल तर काय बोलावं…
मनातले कल्लोळ कल्लोळ..schizophrenia हा शब्दही तेव्हा पहिल्यांदा कळला होता या सिनेमामुळे.. अतुल कुलकर्णी, देविका दफ्तरदार, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी सगळे अभिनयातले एक्के एकत्र… मनाचा ठाव कुणाला लागत नाही कधीच.. पण हे मन देवराईसारखं भासलं सुमित्रा मावशींना.. आणि जगाला त्यांनी ते दाखवलं.. पोचवलं एका अप्रतिम कलाकृतीतून..
कासव…
तुमच्या मनाला ऐकू येणारी समुद्राची गाज म्हणजे ‘कासव’ हा सिनेमा…. अनेकांना साधता न येणारा पण या मनस्वी कलाकारांना साधता आलेला अनमोल असा ठहराव म्हणजे कासव हा सिनेमा…
लहर समंदर रे…. नैराश्यावर बोलणारा आशादायी आणि आनंददायी सिनेमा…. मला अतिशय आवडला.. मी ही हरवून गेले त्या मानवेंद्र आणि जानकीच्या प्रवासात…. मनाने जोडलेल्या नात्यांच्या त्या सुंदर कुटुंबात…त्या घरात जिथे मानवला घरपण मिळालं…जानकीला तिचं हरवलेलं पिल्लू मिळालं… मला एक चांगला सिनेमा मिळाला… स्वत:मध्ये खोलवर बुडून गेले आणि पुन्हा वरही आले नव्या उर्जेसह…जेव्हा कुणीच नसतं तेव्हा कुणीतरी नक्की असतं …जे तुमच्या मनातील लाटांचे तरंग ओळखतं आणि हळुवार तुम्हाला हात देतं…
सुनील सुकथनकर आणि सुमित्रा मावशी..
पुन्हा एकदा hats off एका अप्रतिम कलाकृतीसाठी…
सुमित्रा मावशी…. मी अनेक वेळा तुम्हाला भेटू शकले, सिनेमा discuss करू शकले, तुमची मुलाखत अनेकदा घेऊ शकले… तुम्हीही अत्यंत प्रेम दिलंत..हेच संचित आता कायम राहील सोबत..आणि काय काय दिलं ते सगळंच शब्दांत मांडता येणार नाही… कधीही भेटलो तेव्हा अतिशय प्रेमाने बोललात, आपलंसं केलंत, हीच माझी पुंजी.. खूप प्रेम❤️❤️❤️🙏🙏🙏
पलकें ना मुंदो…..काश, हे शक्य झालं असतं! 🙏
- नीलिमा कुलकर्णी (सिनेअभ्यासक)