‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
विनोदवीर कुशल बद्रीके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळुन हसवून त्यांच मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’.या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल बद्रीके त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतो. मात्र, आता हाच विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला कुशल पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे. कुशल लवकरच खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात कुशल क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल प्रथमच ऐतिहसिक आणि नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. (Actor Kushal Badrike)
त्याच्या या नव्या भुमिकेबद्दल सांगताना कुशल म्हणतो, ”बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता.‘बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे”. कुशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच तो संजय जाधव यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे, आणि आता त्याच्या या नव्या सिनेमाच्या लूकमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या १२ मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. अशा शब्दात कुशलने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. येत्या १२ मे ला ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
============================
===========================
आतापर्यंत विनोदी व्यक्तीरेखा साकारताना दिसणारा कुशल अशा नकारात्मक आणि गंभीर भूमिकेत नेमका कसा दिसेल? आणि प्रेक्षक ही त्याला अशा व नव्या भूमिकेत स्वीकारतील का? हे बघणं ही तितकच महत्वाच असणार आहे.