Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत उर्मिला कोठारेची होणार धमाकेदार एंट्री

 ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत उर्मिला कोठारेची होणार धमाकेदार एंट्री
मिक्स मसाला

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत उर्मिला कोठारेची होणार धमाकेदार एंट्री

by शुभांगी साळवे 12/04/2023

काही मालिका खुप कमी वेळात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक होऊन जातात. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका त्यातलीच एक वेगळा विषय, कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे ही मालिका कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. आता या मालिकेत स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मल्हारच आपले वडील आहेत ही गोष्ट स्वराजला कळली आहे. इतकी वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या स्वराज म्हणजेच स्वराच्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मल्हारला ही गोष्ट स्वराज सांगू इच्छित असला तरी नियतीच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी आहे. मल्हारला बाबा अशी हाक मारण्याचा क्षण आयुष्यात येण्यापूर्वीच स्वराजने अपघातात त्याचा आवाज गमावलाय.(Urmilla Kothare) 

Urmila Kanetkar

स्वराज त्याच्या मनातली भावना कशी व्यक्त करणार हे मालिकेतील पुढील भागांमधून आपल्या समोर येणार आहे. मात्र आता स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरु असतानाच मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारेची एण्ट्री होणार आहे. उर्मिलाने मालिकेत स्वराच्या आईचं म्हणजेच वैदेही हे पात्र साकारलं होतं. मालिकेत वैदेहीचं गंभीर आजारामुळे निधन दाखवण्यात आलं असलं तरी स्वराच्या आठवणींमधून उर्मिलाचं दर्शन प्रेक्षकांना होत राहिलं होत. आता उर्मिला या मालिकेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंजुळा सातारकर असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तिच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे. याआधी उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पडद्यावर पाहिलं आहे. मात्र ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतला अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके आहे. 

Urmila Kanetkar

या नव्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होताना अतिशय आनंद होत आहे. या मालिकेत मी वैदेही ही व्यक्तिरेखा साकारली होती. वैदेही या पात्राच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा शिकायला मिळाला. आता मंजुळा सातारकर ही नवी व्यक्तिरेखा साकारणार आहे जी साताऱ्याकडची आहे. या भाषेचाही वेगळा गोडवा आहे. याआधी अशा पद्धतीचं पात्र मी साकारलेलं नाही. या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषांचा लहेजा मला आत्मसात करता येतोय. मंजुळा हे पात्र वैदेही सारखं दिसणारं आहे. तिच्या येण्याने स्वराज आणि मल्हारच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठी नक्कीच सरप्राईज असेल, असं म्हणत उर्मिलाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.(Urmilla Kothare) 

=====

हे देखील वाचा: तब्बल ६ वर्षानंतर प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावर एंट्री, ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका !

=====
उर्मिला कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ तसेच तिच्या लेकिसोबतचे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी उर्मिला आणि तिचा नवरा आदिनाथ मध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु होत्या. उर्मिला स्वतःच्या घरातील प्रोडक्शन हाउस सोडून दुसऱ्याच प्रोडक्शन हाउसच्या मालिकेमध्ये काम करते, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं होत. मात्र त्या दोघांनीही या विषयावर काही स्पष्टीकरण दिले नव्हते. महेश कोठारे दिग्दर्शित शुभ मंगल सावधानच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिलाची प्रेमकहाणी सुरु झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि डिसेंबर २०११ मध्ये ते विवाहबंधनात अडकले होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aadinath kothare Entertainment Marathi Serial Star Pravah tujhech geet mi gat aahe Urmila Kanetkar urmila kanetkar serial Urmila kothare
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.