‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
यांच्यासाठी किशोर कुमारने तीन गाण्यात प्ले बॅक दिला!
पन्नासच्या दशकामध्ये शम्मी कपूर हिंदी सिनेमाच्या पडद्यावर पहिल्यांदा आला. सुरुवातीच्या अनेक फ्लॉप चित्रपटानंतर १९५८ सालच्या ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटापासून त्याच्या यशाची आणि लोकप्रियतेची इनिंग सुरू झाली. त्यानंतर पुढचं संपूर्ण दशक शम्मी कपूरचे होते. या काळात शम्मी कपूरसाठी मोहम्मद रफी हे कॉम्बिनेशन जवळपास निश्चित झालं होतं. काही अपवादात्मक परिस्थितीतच तलत मेहमूद, मन्ना डे यांनी शम्मी कपूरसाठी साठी पार्श्वगायन केले. परंतु या संपूर्ण कालखंडात एकदाही किशोर कुमारने (Kishore Kumar) शम्मी कपूर साठी पार्श्वभूमी केले नाही. शम्मी कपूर आणि किशोर कुमार (Kishore Kumar) हे दोघे चांगले मित्र होते आणि शम्मी कपूर कायम त्याला असं सांगत होता,”यार माझ्यासाठी तू एखादं तरी गाणं गा!” पण योग जुळून येत नव्हता. १९५६ साली ‘मेम साहेब’ या चित्रपटात शम्मी कपूर आणि किशोर कुमार या दोघांनी एकत्र काम केले होते. नायिका होती मीनाकुमारी. या चित्रपटात शम्मी कपूरसाठी तलत मेहमूद यांनी पार्श्वगायन केले तर किशोर कुमारची गाणी त्यांनी स्वतःच गायली.
यानंतर मात्र या दोघांनी एकत्र पडद्यावर काम केले नाही. त्यामुळे शम्मी कपूरसाठी किशोर कुमारचे पार्श्वगायन हा योग काही जुळून आलाच नाही. त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. कौटुंबिक संबंध देखील चांगले होते. किशोर कुमारची (Kishore Kumar) पहिली बातमी रूमा देवी ही शम्मी कपूरची चांगली मैत्रीण होती. त्या दोघांनी एकत्र पृथ्वी थिएटर मध्ये काम केले होते. किशोर कुमारची दुसरी पत्नी मधुबाला हिने देखील शम्मी कपूर सोबत काही चित्रपटात भूमिका केल्या होत्या. किशोर कुमारची तिसरी पत्नी योगिता बाली ही शम्मी कपूरची पहिली पत्नी गीता बालीची भाची होती. या लग्नाला स्वतः शम्मी कपूर उपस्थित होता. किशोर कुमारची (Kishore Kumar) चौथी पत्नी लीना चंदावरकर ही शम्मी कपूर सोबत ‘प्रीतम’ या चित्रपटात झळकली होती.
याचा अर्थ किशोर कुमारच्या (Kishore Kumar) चारही पत्नीशी शम्मी कपूर यांचे चांगले संबंध होते. किशोर कुमार देखील शम्मीचा खूप चांगला मित्र होता परंतु या दोघांना एकत्र अभिनेता आणि पार्श्वगायक असा संबंध आला तो थेट सत्तरच्या दशकानंतर! या काळात किशोर कुमार (Kishore Kumar) प्रत्येक अभिनेत्याचा पार्श्वगायक बनला होता. पण या काळात शम्मी कपूर नायक म्हणून दूर झाला होता आणि त्याने चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करायला सुरुवात केली होती. त्यामुळे हा योग येणे अवघड दिसत होते. परंतु ऐंशीच्या दशकामध्ये तीन गाण्यासाठी हा योग जुळून आला. 1981 साली ‘अरमान’ नावाचा एक चित्रपट आला होता. हा चित्रपट खरं गाजला त्यातील दोन डिस्को गाण्यांमुळे! ही गाणी होती ‘रंभा हो हो संभा हो हो…’ आणि ‘हा मेरी जैसे हसीना कोई…’ या चित्रपटांमध्ये शम्मी कपूरला एक अतिशय अप्रतिम गाणं पडद्यावर साकार करायला मिळालं होतं. पियानोवर बसलेला शम्मी कपूर आणि किशोर कुमार हे गाणं इंदीवर यांनी लिहिलं होतं आणि गीताचे बोल होते ‘जीवन मिटाना है दिवाना पन कोई प्यार जीवन से प्यारा नही…. ‘ बप्पी लहरी यांनी स्वरबद्ध केलेल हे गाणं अतिशय अप्रतिम होतं या गाण्याची लिंक मी खाली दिली आहे तुम्ही देखील हे गाणे ऐकून पाहा.
यानंतर १९८३ साली सुभाष घई यांच्या ‘विधाता’ या चित्रपटात एक जबरदस्त हिट गाणे शम्मी कपूरला मिळाले होते. जे किशोर कुमारने (Kishore Kumar) गायले होते. गीताचे बोल होते ‘सात सहेलीया खडी खडी फरियाद सुनाये घडी घडी…’ हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय आणि वादग्रस्त देखील बनले होते. हे गाणे अश्लील आहे म्हणून आकाशवाणी आणि दूरदर्शन ने या गाण्याला काही काळ बँन देखील केले होते! याच वर्षी मिथुन चक्रवर्तीचा ‘वांटेड’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटांमध्ये धमाल गाणे चित्रीत झाले होते. या गाण्यात मध्ये शम्मी कपूरच्या चित्रपटांची नावे होती. किशोर कुमार सोबत टीना मुनीम गायलेले हे गाणे खूपच धमाल होते. शम्मी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर हे गाणे चित्रित झाले होते.
१९८४ साली किशोर कुमारने (Kishore Kumar) एका चित्रपटाची निर्मिती करायचा निर्णय घेतला. चित्रपटाचे नाव होते ‘अजनबी’. या सिनेमात शम्मी कपूरला एक महत्त्वाची भूमिका मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संगीत किशोर कुमार यांचेच असणार होते. या सिनेमाची काही चित्रीकरण उटी येथे झाले होते. परंतु नंतर किशोर कुमार (Kishore Kumar) त्याच्या परदेश दौरे आणि स्टेज शोमध्ये जास्त बिझी झाल्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण लांबले. नंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा किशोर कुमार शम्मी कपूर कडे जाऊन म्हणाला,” आपल्याला पुन्हा या सिनेमाची शूटिंग सुरू करायचे आहे. तुम्ही तयार राहा.” परंतु हा योग काही आलाच नाही. कारण त्यानंतर काही दिवसातच १३ ऑक्टोबर १९८७ रोजी किशोर कुमार यांचे हृदयविकारांने निधन झाले. आणि शम्मी कपूरला किशोर कुमारच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे संधी राहूनच गेली. एका व्हिडिओ मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये शम्मी कपूर ने किशोर कुमार (Kishore Kumar) जीनियस असे म्हटले होते. शम्मी कपूरच्या नायक पदाच्या लोकप्रिय काळामध्ये किशोर कुमारने त्याच्यासाठी पार्श्वगायन केले नाही परंतु चरित्र अभिनेता झाल्यानंतर मात्र तीन गाण्यासाठी किशोरने प्लेबॅक केले आणि हे तीनही गाणी अप्रतिम अशी बनली. ही गाणी जरूर पाहा.