Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

City Of Dreams 3 चा धमाकेदार ट्रेलर आला समोर; प्रेक्षकांची उस्तुकता आणखी वाढली
ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोज एका वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज होत असतो. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा भाग सिझन प्रचंड गाजला होता. त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ही वेबसीरिज कायमच चर्चेचा विषय ठरलेली पाहायला मिळाली. सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर निर्मात्यांनी या मालिकेच्या तिसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज केला आहे. या वेब सीरिजची कथा महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित आहे. या मालिकेची कथा गायकवाड कुटुंबाभोवती फिरते. सिटी ऑफ ड्रीम्स हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.(City Of Dreams 3)

मालिकेचा तिसरा भाग खूपच भारी दिसत आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी गायकवाड कुटुंबात अंतर्गत लढाई सुरू असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. सिरीजच्या तिसऱ्या भागाच्या कथेत प्रसारमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ इतर तीन खांब पाडण्यासाठी पुरेसा आहे, असे ट्रेलरमध्ये म्हटले आहे. प्रेक्षक या सिरिजची आता आतुरतेने वाट पाहत आहेत. नागेश कुकुनूर हे सिटी ऑफ ड्रीम्सचे कर्ता धर्ता आहेत. या सिरिजमध्ये अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर आणि एजाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिरिजमध्ये अतुल कुलकर्णी यांच्या भूमिकेचे नाव अमेयराव गायकवाड असे आहे. तर प्रिया बापट त्यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत बाप-लेकीमध्ये सत्ता आणि विचारधारेची लढाई पाहायला मिळणार आहे.

काही दिवसापूर्वी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर याचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या सिझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.ट्रेलरमध्ये काही दृश्य पाहिल्यानंतर हा सिझन फारच खास असणार असल्याचे दिसत आहे.मालिकेची कथा जिथून संपली तिथूनच या नव्या भागाचीसुरुवात होईल.मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये अमेयराव गायकवाड पुन्हा सत्तेत येण्यासाठी सज्ज झाले होते मात्र त्यांची राजकारणाची पद्धत खूप जुनी आहे. तर अमेय गायकवाडांची मुलगी पौर्णिमा नव्या विचारधारेने सत्तेचा पाठपुरावा करू इच्छित आहे.(City Of Dreams 3)
===========================
हे देखील वाचा: Adipurush Trailer: अखेर मोस्ट अवेटेड ‘आदिपुरुष’ सिनेमा चा ट्रेलर आला समोर !
===========================
‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सिझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला. तर या वेबसीरिजचा दुसरा सिझन ३० जुलैला प्रदर्शित झाला होता. यानंतर आता येत्या २६ मे रोजी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसरा सिझन डिस्ने + हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.