‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार आणि त्यांचे राजकीय करियर!
राजेश खन्ना, बॉलीवूडचे पहिलेवहिले सुपरस्टार (Bollywood Superstar). आपल्या सिनेप्रवासात त्यांनी जो मैलाचा दगड गाठला, तिथपर्यंत पोहोचणे त्यांच्या अगोदरही कुणाला जमले नव्हते आणि त्यांच्यानंतर देखील कुणाची तिथपर्यंत मजल गेली नाही. एका टॅलेंट हंट दरम्यान शोधून आणलेला मुलगा एक दिवस बॉलीवूडच्या गळ्यातील ताईत बनेल असा कुणी स्वप्नात देखील विचार केला नसेल. राजेश खन्नानी मात्र ते करून दाखवलं.(Bollywood Superstar)
१९६९ ते १९७३ यादरम्यानचा कालखंड त्यांच्या करियरमधील सर्वोत्तम काळ होता. त्या काळात चित्रपटगृहात फक्त राजेश खन्नांचेच चित्रपट चालायचे. लोक एका चित्रपटगृहात त्यांचा एक चित्रपट पाहायचे आणि लगेच दुसऱ्या चित्रपटगृहात जाऊन दुसरा चित्रपट पाहायचे. त्यांची साधी एक झलक पाहण्यासाठी लोक तासनतास रांगेत ताटकळत उभी राहायचे. (Bollywood Superstar)
आशीर्वादसमोर जेव्हा त्यांची पांढऱ्या शुभ्र रंगाची चारचाकी थांबायची तेव्हा बंगल्याचा गेट उघडेपर्यंत बायका येऊन त्यांच्या गाडीला गराडा घालून उभ्या असायच्या, त्यांच्या गाडीचे चुंबन घेत सुटायच्या. त्यांची पांढरी शुभ्र गाडी क्षणात लालभडक होऊन जायची. त्यांची गाडी जिथून जायची तेथील धूळ उचलून बायका आपल्या डोक्यावर लावायच्या. यांसारखे अनगणित किस्से राजेश खन्नाच्या स्टारडमची प्रचीती आपल्याला करून देतात. त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंचं त्यासोबतच राजकीय क्षेत्रात देखील आपलं नशीब त्यांनी आजमावून बघितलं. त्यांची एकंदरीतच राजकीय कारकीर्द कशी राहिली याबद्दल जाणून घेऊया.(Bollywood Superstar)
चित्रपटामध्ये आपला जम बसवल्यानंतर राजेश खन्ना राजकीय क्षेत्राकडे वळले. १९९१ सालच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यासमोर त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढवली. या रणसंग्रामात त्यांनी लालकृष्ण अडवणी यांना जवळपास हरवले होते. राजकारणात नवख्या असणाऱ्या राजेश खन्ना यांचा फक्त १५८९ मतांनी पराभव झाला. हा निकाल लागल्यानंतर या निकालाविरोधात राजेश खन्ना यांनी आक्षेप घेत गोंधळ माजवला होता. (Bollywood Superstar)
=======
हे देखील वाचा : Adipurush Trailer: अखेर मोस्ट अवेटेड ‘आदिपुरुष’ सिनेमा चा ट्रेलर आला समोर !
=======
अडवानी यांनी दिल्ली आणि गांधीनगर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना दोन्हीपैकी एक मतदारसंघ सोडावा लागणार होता, त्यांनी दिल्लीचा मतदार सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या खाली झालेल्या जागेवर १९९२ साली पुन्हा निवडणुका झाल्या. यावेळी मात्र राजेश खन्ना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव करत संसदेत पाऊल ठेवले. १९९६ पर्यंत ते इथून खासदार राहिले. आपल्या संसदीय कार्यकाळादरम्यान त्यांनी चित्रपटापासून दूरच राहणे पसंत केले. निवडणुकीच्या रिंगणात जरी ते १९९१ साली उतरले असले तरी फार काळापासून ते कॉंग्रेसचा प्रचार करत असायचे. आपल्या खासदारकीनंतर देखील ते कॉंग्रेसच्या प्रचारादरम्यान कार्यरत राहिले. (Bollywood Superstar)
१८ जुलै २०१२ रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान केला. त्यांचे छायचित्र असलेले टपालाचे तिकीटदेखील जारी करण्यात आले. रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले.