दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Vaibhav Mangle: नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर वैभव मांगलेंनी पोस्ट लिहित व्यक्त केला संताप
मराठी सिनेमांप्रमाणे आता मराठी नाटक ही सातासमुद्रापार पोहोचले आहे. प्रेक्षकांचे करण्यामध्ये आता नाटकाचा मोठा वाटा आहे. सिनेमा बघण्यासाठी जशी गर्दी होते तशीच गर्दी आता नाट्यगृहाबाहेर ही पाहायला मिळत आहे. अनेक नाटकांच्या बाहेर हाउसफ़ुलचा बोर्ड सुद्धा पाहायला मिळतो. पण अस जरी असलं तरी काही गोष्टी या अजिबात बदलल्या नसल्याच पाहायला मिळत आहे ज्यामुळे नाटक पाहायलाआलेल्या प्रेक्षकांना आणि ते नाटक सादर करणाऱ्या कलाकारांना ही त्याचा त्रास भोगावा लागत आहे. नाट्यगृहांतील दुरावस्थेमुळे कलाकार तसेच प्रेक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नाट्यगृहातील गैरसोयीबाबत याबद्दल या आधी ही अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आजही ती परिस्थिति जैसे थे. आता असाच एक अनुभव प्रसिद्ध मराठी अभिनेता वैभव मांगले यांना आला आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर याविषयीच पोस्ट लिहित स्वतःच्या भावना व्यक्त करुन नाराजी जाहीर केली आहे. सध्या अभिनेता वैभव यांच मांगले ‘संज्या-छाया’ या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. प्रेक्षकांचा ही या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. आता केवळ ,मुंबई किंवा पुणेच नाही तर सध्या महाराष्ट्रभर या नाटकांचे प्रयोग होत आहेत.(Vaibhav Mangle)
याचदरम्यान पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग सुरू असताना कलाकारांची कशी गैरसोय याबद्दल वैभव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे. पाहूयात त्यांनी काय लिहिल आहे ते.’पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग ‘संज्या छाया’चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. ‘प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात( विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा , कोथरूड यशवंतराव .. उकाडा ) ) प्रयोग पाहात होते . एक मर्यादे नंतर नाशिक मध्ये रसिकांचा राग ,हतबलता अनावर झाली त्यांनी गोंधळ केला . तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले . पण आपण show must go ȏṅ वाले लोक, आम्ही विनंती केली की आम्हाला ही त्रास होतोच आहे… इथे येई पर्यंत माहित नव्हतं कि कि ac नाहीयेय .
आमच्या निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27 चे शो रद्द केले .त्या हवे चे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला . कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता . या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय . कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी ??? विचारलं तर सांगतात AC चालू आहे पण खूप गर्मी असल्याने ac यंत्रणा नीट काम करत नाही . पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही . काय बोलावं या सगळ्यावर वर .????????'(Vaibhav Mangle)
============================
===========================
अशा शब्दात वैभव मांगले यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. या आधी ही अनेक कलाकारांनी या समस्येसाठी आवाज उठवला होता मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. आता वैभव मांगले यांनी ही पोस्ट लिहून पुनः एकदा या समस्येला वाचा फोडली आहे. किमान आता यावर काही तरी उपाय निघेल ही आणि ही समस्या सुटेल अशी आशा आहे.