‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
दंगल अभिनेत्री सान्या मल्होत्रा सोबत दिल्ली मेट्रोमध्ये घडला घाणेरडा प्रकार; प्रसंग सांगताना अभिनेत्रीला कोसळले रडू
दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या तिच्या ए जॅकफ्रूट मिस्ट्री या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे नुकताच हा सिनेमा ओटीटीवर आला आहे, आणि लोकांना पण तो आवडत आहे. या सगळ्यात तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीला दिल्ली मेट्रोमधील तिच्याबरोबर झालेल्या छेडछाडीची आठवण झाली आहे, या दरम्यान ती खूप भावूकही झाली आहे. सान्या ही दिल्लीस्थित असून तिने इथूनच आपले शिक्षणही पूर्ण केले आहे. नुकतीच अभिनेत्रीने एक मुलाखत दिली, या मुलाखतीत सान्या मल्होत्राने सांगितले आहे की, तिच्यावर अनेकदा सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करण्यात आली आहे, या मुलाखतीदरम्यान अभिनेत्री तिचे अश्रु रोखू शकली होती. (Sanya Malhotra)
मुलाखतीदरम्यान सान्या मल्होत्रा म्हणाली, ‘मी कॉलेजमधून निघायचे तेव्हा ७ ते ८ वाजायचे आणि अनेकदा काही मूल मला फॉलो करत होते. एकदा कॉलेज सुटल्यावर मी ग्रीन पार्कहून मेट्रो पकडली. मी मेट्रोत होतो आणि चार-पाच मुलं होती, महिलांना माहित असत की पुढे काही तरी वाइट होणार आहे. मी एकटीच असल्यामुळे गप्प होतो. कारण जेव्हा कोणी एकत्र असतं, तेव्हा तुम्हाला हिंमत मिळते. “सान्या मल्होत्रा पुढे म्हणाली, ‘काही वेळानंतर त्या मुलांनी मला चिडवायला सुरुवात केली आणि मग मला स्पर्श करायला सुरुवात केली. मी असहाय झाले होते आणि मला वाटले की जर मी जास्त बोललो तर या परिस्थितीत काहीही होऊ शकते. मला लोक विचारतात तुम्ही ते कस काय होऊ दिल? तू काही का केलं नाहीस? पण जेव्हा तुम्ही अशा स्थितीत असता तेव्हा तुमचे हातपाय थरथरतात . त्यावेळी तुम्ही कसेबसे वाचाल असे आपल्याला वाटत असते.
त्यानंतर सान्या म्हणाली “मेट्रोत मला कुणी मदत केली नाही, पण मी भांडतही होते. नंतर मी राजीव चौकात उतरले आणि धावायला लागले. ती मुलं माझा पाठलाग करू लागली, ही मुले ६.२ फूट उंच होती, देवाचे आभार की राजीव चौकात खूप गर्दी होती आणि मी बचावले. यानंतर तिने स्वत:ला शांत केले आणि मग वडिलांना घ्यायला बोलावले. हा किस्सा सांगताना अभिनेत्रीचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि ती रडली. स्टार बनल्यानंतरही तिने अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचे ही सान्याने सांगितले. ती म्हणाली “काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत आणखी एक घटना घडली होती, त्याचे फुटेजही इंटरनेटवर उपलब्ध असेल. मी कुठेतरी होते आणि तेव्हा एक फॅन फोटो क्लिक करण्यासाठी आला. फोटो काढताना त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला, मला एकदम धक्का बसला. मी खूप अस्वस्थ झाले, तरीही तिथे उपस्थित फोटोग्राफर्सपैकी कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. मी त्या माणसाला बोलावले आणि त्याला सांगितले की तू जे आता केलस ते योग्य केले नाहीस.”(Sanya Malhotra)
====================================
====================================
याशिवाय सान्याला बॉडी शेमिंगहीचा ही सामना करावा लागला आहे . त्याच मुलाखतीत ती म्हणाली की, दंगलच्या चित्रीकरणादरम्यान तिला कोणीतरी सांगितले होते की तुझा जबडा दिसायला योग्य नाही. तू शस्त्रक्रियेद्वारे ते दुरुस्त करून घे, सान्या म्हणाली की, मला माहिती ही नव्हते की अस ही काही करता येते.