Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी !

 ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी !
kalakruti-prashant-damle-and-kavita-lad-to-appear-on-stage-of-kaun-honar-crorepati-special-episodmarathi-infp
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी !

by शुभांगी साळवे 30/06/2023

जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती‘. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या‘विशेष भागात‘मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे हॉट सीटवर येणार आहेत. प्रशांत दामले आणि कविता लाड  ‘कोण होणार करोडपती’चा खेळ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळले आहेत. ते स्वतः अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आहेत. मराठी नाटकांच्या भविष्यासाठी ते ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. ह्या विशेष भागाची सुरुवात प्रशांत दामले त्यांच्या ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याने होणार आहे.  त्यामुळे मंचावर एकदम वेगळेच वातावरण तयार झालेले पहायला मिळेल .(Kon Honar Crorepati Special Episode)

Kon Honar Crorepati Special Episode
Kon Honar Crorepati Special Episode

प्रशांत दामले आणि कविता लाड हे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर अनेक विषयावर आपले मन मोकळे करणार आहेत. प्रशांत दामले काही ठरावीक नाट्यगृहांत प्रयोग का करत नाहीत, याबद्दल ही त्यांनी  सांगितले. प्रशांत दामले  यांनी  मोरूची मावशी नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. सुरुवातीला १६१ प्रयोग होईपर्यंत  हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजले नव्हते.त्यानंतर दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी त्यातील गाणे सादर केले. ते गाणे प्रेक्षकांना इतके आवडले की त्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यापुढील आजपर्यंतचे सगळे प्रयोग हाऊसफूल गेले, अशी आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली. कविता लाड यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचे फार कौतुक केले. त्यांच्यासारखा नट रंगभूमीवर सतत काम  करतो आहे, त्यामुळे सगळ्यांनाच कामाचा हुरूप येतो. 

Kon Honar Crorepati Special Episode
Kon Honar Crorepati Special Episode

प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी भरपूर वर्षे एकत्र काम केले आहे. आजवरच्या कारकिर्दीत झालेल्या अनेक आठवणी  आज या मंचावर  उलगडणार  आहेत. अनेक नाटकांदरम्यान झालेले किस्से आणि आठवणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील आणि ते किस्से आणि त्या आठवणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. मराठी रंगभूमीवरील हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि  कविता लाड यांच्या सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग १ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी  वाहिनीवर  पाहायला मिळेल.(Kon Honar Crorepati)

========================

हे देखील वाचा: Ramayan:’आदिपुरुष’ला टक्कर देण्यासाठी पुन्हा सुरु होणार रामानंद सागर यांचे ‘रामायण’ 

=======================

जिंकलेली रक्कम ते अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेस देणार आहेत. आता अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळताना ‘कोण होणार करोडपाती’च्या खेळात ते  किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment kavita lad Kon Honar Crorepati Kon Honar Crorepati special episode Kon Honar Crorepati vishesh prashant damale sachin khedekar Sony marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.