Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Salaar Teaser Out: प्रभास च्या बहुचर्चित ‘सालार’ सिनेमाचा टीजर आउट 

 Salaar Teaser Out: प्रभास च्या बहुचर्चित ‘सालार’ सिनेमाचा टीजर आउट 
kalakruti-salaar-movie-teaser-out-prabhas-much-awaited-Salaar-teaser-out-marathi-info/
मिक्स मसाला

Salaar Teaser Out: प्रभास च्या बहुचर्चित ‘सालार’ सिनेमाचा टीजर आउट 

by शुभांगी साळवे 06/07/2023

आदिपुरुषनंतर प्रभास स्टारर सालार सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाला मिळणारे प्रेम पाहता सालार हिट होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रशांत नील दिग्दर्शित प्रभास स्टारर मोस्ट अवेटेड सालार पार्ट 1:सीईटीचा टीझर रिलीज झाला आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर सालार जगातील विक्रमांना ब्रेक करु शकतो, असं ही चाहत्यांचं म्हणणं आहे. आज सकाळी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तेलुगू सिनेमाचा सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा दिसला आहे. प्रभास आपल्या दमदार अॅक्शन आणि डायलॉग्सने चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. ‘सालार’च्या टीझरमध्ये धांसू अॅक्शनची अशी झलक पाहायला मिळत आहे, जी पाहून कोणीही थक्क होईल. टीझर रिलीज झाल्यानंतर अर्ध्या तासातच युट्युबवर त्याला अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Salaar Movie Teaser
Salaar Movie Teaser

प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’च्या टीझरमधील प्रत्येक सीन व्हिज्युअल एन्जॉय करणारा आहे. ‘सालार’च्या टीझरची सुरुवात अभिनेता-दिग्दर्शक टीनू आनंदपासून होते, ज्यांना परदेशी गुंडांनी घेरले आहे. प्रत्येकाच्या हातात शस्त्रे पहायला मिळत आहेत. मग ते म्हणतात की,”आई एम चीता, टाइगर, एलिफेंट…वेरी डेंजरस…बट नॉट इन जुरासिक पार्क,बोकॉज इन दॅट पार्क देअर इज…” एवढं बोलून ती व्यक्ती थांबते. ही व्यक्ती म्हणजे ‘सालार’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेली टीनू आनंद. यानंतर सीन कट केला जातो आणि प्रभास हातात चाकू आणि रायफल घेऊन शत्रूंवर एकाच वेळी येताना दिसतो. टीझरमध्ये प्रभास शिवाय पृथ्वीराज सुकुमारन यांचीही एक भयानक झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत असल्याचे पहायला मिळत आहे. 

Salaar Movie Teaser
Salaar Movie Teaser

काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत निर्मात्यांनी आज म्हणजेच 6 जुलै रोजी पहाटे 5 वाजून 12 मिनिटांनी टीझर येण्याची घोषणा करून प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवला होता. टीझरमध्ये दमदार अॅक्शन आणि जबरदस्त डायलॉग्सची झलक आता प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

==========================

हे देखील वाचा: Gadar 2: ‘उड़ जा काले कांवा’ चा फर्स्ट लूक रिलीज,पाहा सकीना आणि तारा सिंगची जोडी

=========================

या सिनेमाद्वारे प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हसन, ईश्वरी राव, जगपती बाबू, श्रिया रेड्डी आणि इतर कलाकार मोठ्या पडद्यावर आपल्या व्यक्तिरेखांद्वारे चाहत्यांची मने जिंकताना दिसतील. प्रशांत नील दिग्दर्शित हा बहुप्रतीक्षित चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: director prashant neel Entertainment prabhas Prabhas movie Salaar movie 2023 Salaar Movie Teaser shruti hasaan tamil starcast
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.