५०० रुपयांच्या गजऱ्याचे अमिताभ बच्चन यांनी दिले ५ हजार रूपये; कारण ऐकून तुम्ही ही कराल कौतुक
बॉलिवूडचे ‘शहेनशाह‘ म्हणजेच अमिताभ बच्चन जितके मोठे अभिनेते म्हणून आहेत तितकेच त्यांचे मन ही मोठे आहे. बिग बी नेहमीच अनेकांना मदत करताना पाहिले गेले आहेत आणि ते त्यांनी केलेल्या मदतीचा कधीही अभिमान बाळगत नाहीत. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे अमिताभ बच्चन चर्चेत आले आहेत आणि त्याच कारण ही तसेच खास आहे. अमिताभ बच्चनयांना मुंबईच्या रस्त्यांवर पावसात गजरा विकणाऱ्या एका मुलीने गजरा विकत घेण्याची विनंती केली. आणि ५०० रुपयांना गजरा विकत घेण्याऐवजी बिग बींनी मुलीकडून गजऱ्याचे संपूर्ण बंडल पाच हजार रुपयांना विकत घेतले. इतकंच नाही तर बिग बींनी नंतर गजराची संपूर्ण टोपली मुलीला परत केली आणि आशीर्वाद सुद्धा दिले.(Amitabh Bacchan)
अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण घटना सांगितली आणि सांगितले त्यांनी लिहिले आहे की, पावसात ट्रॅफिक सिग्नलवर एक तरुणी त्यांच्याजवळ गजरा विकण्यासाठी आली होती.अमिताभ बच्चन पुढे लिहितात की, त्या मुलीचे हात माझ्या गाडीच्या काचेवरही पोहचत नव्हते . तिच्या डोळ्यांत बघून असं वाटत होतं की जणू आपल्या घरच्या मोठ्यांना खाऊ घालण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. गजरा दाखवण्यासाठी तिने हात वर केले. आणि ती काहीच बोलली नाही. फक्त तिथेच उभी होती.अमिताभ यांनी पुढे लिहिले की, ‘असे काम जे प्रोटोकॉल मला करू देत नाही… मी गाडीची विंडशील्ड खाली केली. सुरक्षारक्षकांनी मला तसे करू नका असे सांगितले असले तरी त्या दिवशी मी त्यांना थांबवले. तुला काय हवंय ते मी मुलाला विचारल. तिने मला पुन्हा गाजरांचा गुच्छा दाखवला. मला तिच्याकडून ते विकत घ्यायची इच्छा दाखवली तर त्या मुलीने तिच्याकडच्या संपूर्ण गुच्छातून एक गजरा काढला.
अमिताभ यांनी पुढे लिहिले की, “ती किंमत सांगण्यास संकोच करत होती, तिला वाटले असते की जर मी किंमत सांगितली तर मी मोलभाव करेल किंवा त्याहूनही वाईट, मी गजरा खरेदी करण्याचा माझा विचार बदलून टाकेन.ती हळुवारपणे आणि घाबरून कुजबुजली ५०० रुपये.. आता लिहीत असताना माझे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत. मी नोटांचे बंडल काढले…मी पाहिले नाही की त्यात किती रुपये होते बहुदा सुमारे ४-५ हजार असतील… गजरेचा बंडल घेताना मी तिला तो पैशांचा बंडल दिला .आणि तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद होता, जो तिला यापूर्वी कधीच मिळाला नसेल .”(Amitabh Bacchan)
===========================
===========================
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या पोस्ट वर त्यांच्यावर अनेक चाहते आणि कलाकार ही कमेंट करत त्यांच कौतुक करताना पहायला मिळत आहेत.